देशभरात आजपासून कोरोना लसीचा ड्राय रन

देशभरात आजपासून कोरोना लसीचा ड्राय रन

भारतात १८ वर्षावरील सर्वांना लस, नोंदणीच्या ५ सोप्या स्टेप्स करा फॉलो ?

नव्यावर्षाच्या सुरुवातील देशातील नागरिकांना दिलासादायक बाब घडली. एक म्हणजे पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट आणि ऑक्सफर्डमार्फत तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीला सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने परवानगी दिली आहे. तसेच आजपासून देशात कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देश सध्या कोरोनामुक्त होण्याच्या वाटचालीवर आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात आजपासून कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. याआधी लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशातील चार राज्यातील दोन जिल्ह्यात लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला होता. आता सर्व राज्य सरकार निवडलेल्या जिल्ह्यात ड्राय रनची तयारी केली आहे.

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची ड्राय रनसाठी निवड झाली आहे. पुणे, नागपूर, जालना नंदूरबार जिल्ह्यात आजपासून लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात होणार आहे. माहितीनुसार, पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, मान प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड महाापलिकेच्या भोसरी रुग्णालय अशा तीन केंद्रावर ही प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान सर्व राज्यात होणारे ड्राय रन २० डिसेंबर २०२० रोजी मंत्रालयद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार होणार आहे.

सर्व राज्यातील राजधानीमध्ये तीन सत्रामध्ये ड्राय रन घेण्याचा प्रस्ताव आहे. तसेच जे दुर्गम भागात आहेत, अशा जिल्ह्याचा समावेश केला आहे. प्रत्येक सत्रांसाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी २५ चाचणी करणाऱ्या लाभार्थीची (हेल्थकेअर वर्कर्स) निवड करतील. ज्याप्रमाणे प्रत्यक्षात लसीकरण करताना नियोजन केले जाणार आहे, तशाच प्रकारे लसीकरणाचा ड्राय रन प्रत्येक राज्यात होणार आहे. तसेच मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेन्ट आणि ऑनलाइन डेटा सुरक्षित करणे यासारख्या अनेक गोष्टींच्या चाचण्या केल्या जातील. याशिवाय लसीकरण केल्यानंतर प्रतिकूल होणाऱ्या परिणामानंतरचे ( लसीकरण AEFI) संभाव्य प्रतिकूल घटनांच्या व्यवस्थापनावर ड्राय रनचे महत्त्व असेल.


हेही वाचा – मेड इन इंडिया कोविशील्डच्या आपत्कालीन वापरासाठी भारतात परवानगी


 

First Published on: January 2, 2021 8:20 AM
Exit mobile version