मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा घट; आजचा दर काय?

मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा घट; आजचा दर काय?

पेट्रोल, डिझेल

गुरुवारी (आज) पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरामध्ये घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल प्रतिलिटर १६ पैशांनी कमी झाले आहे, तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात १८ पैशांनी घट झाली आहे. डिझेलचे दर मात्र आज स्थिर आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमती घसरत आहेत. याचाच परिणाम म्हणून इंधानाच्या दरात घट होते आहे. दरम्यान, मुंबईतील पेट्रोलचा आजचा दर ८४.६८ रुपये प्रतिलिटर इतका आहे आणि दिल्लीत पेट्रोलचा आजचा भाव ७९.३७ रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर मुंबई आणि दिल्लीमध्ये डिझेलचा दर अनुक्रमे ७७.३२ रुपये प्रतिलिटर आणि ७३.७८ रुपये प्रतिलिटर इतका आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेली घट सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरते आहे. मध्यंतरीच्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव जवळजवळ शंभरीच्या घरात पोहचले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंधानाचे भाव कमी होत असल्याने नागरिक सुखावले आहेत.

 


आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दर स्वस्त केले आहे. गेल्या १५ ते २० दिवसात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे इंधानाचे दर घसरल्यांचे सांगण्यात येत आहे. याचा लाभ तेल कंपन्या वाहनधारकांना करुन देत आहेत.

First Published on: November 1, 2018 9:25 AM
Exit mobile version