CCTV : महिला कर्मचाऱ्याने टोल मागितला, त्याने ठोसा दिला

CCTV : महिला कर्मचाऱ्याने टोल मागितला, त्याने ठोसा दिला

हरियाणातील गुरुग्राम येथील टोल नाक्यावर एका अज्ञात व्यक्तीने महिला कर्मचारीला मारहाण केली. टोल भरण्यापासून वाचण्यासाठी त्या महिलेच्या नाकावर मारून तो पळून गेला. ही घटना गुरुग्राम मधील खेर्की दौला टोल नाक्यावरील आहे. महिलेला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्याच्या आसपास, ती महिला टोल कर्मचारी तिचं रोजचं काम करत होती. अचानक एक स्कॉर्पियो चालक तिथे आला. त्याने तो शिकोहपुरचा असल्याचे सांगून टोल देण्यासाठी नकार देत होता. नंतर त्या महिला टोल कर्मचारीने तपास चालू केला. त्या दरम्यान तो अज्ञात शिकोहपुरचा नसल्याचे कळाले. मग त्या महिलेने टोल भरण्यासाठी सांगितले. त्यानंतर त्या अज्ञान व्यक्तीने आरडा ओरडा करायला सुरुवात केली. त्याला ओरडताना पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले.

काही वेळानंतर तो अज्ञात व्यक्ती पुन्हा आला आणि त्या महिला टोल कर्मचारीला जोरात नाकवर मारले. त्यामुळे तिच्या नाकातून रक्त यायला लागले. तसेच त्या अज्ञान व्यक्तीने महिलेला उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली. मात्र त्याने महिलेच्या नाकातून रक्त येताना पाहिले आणि ते पाहून आरोपी घाबरून पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या पीडित महिलेने आणि इतर टोल कर्मचाऱ्यांनी या आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. आरोपीच्या गाडीचा नंबर एचआर २६ डीपी ५९८१ आहे. हा नंबर ट्रेस करुन पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. या घटनेच्या अगोदरच्या दिवशी गुरुवारी १ वाजता अशा प्रकारची घटना घडली. टोल भरण्यापासून वाचण्यासाठी एका कार चालकाने टोलचे पैस न देता पळून जाण्याचा प्रयत्न केला. टोल कर्मचाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने टोल कर्मचाऱ्याला धडक मारून वेगाने गाडी पळवून पळ काढला होता.

First Published on: June 21, 2019 11:00 PM
Exit mobile version