लसीच्या तुटवड्यामुळे Covishield च्या डोसमधील अंतर आणखी वाढले? जाणून घ्या सत्य

लसीच्या तुटवड्यामुळे Covishield च्या डोसमधील अंतर आणखी वाढले? जाणून घ्या सत्य

कोविशील्ड लस लोकांवर अधिक प्रभावी आहे, म्हणून त्याच्या दोन डोसांमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आले असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. हा निर्णय एका अभ्यासाच्या आधारे घेण्यात आला आहे. या अभ्यासातून असे आढळून आले की, कोविशील्ड लसीचा दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांनी घेतल्यास ते 85% प्रभावी होईल. सध्या ही लस 79% प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काही लोकांनी अशी शक्यता वर्तवली की, सरकारने लसींचा तुटवडा भागविण्यासाठी कोविशील्ड लसीच्या डोसमधील अंतर 3 महिन्यांपेक्षा जास्त वाढविला आहे. मात्र कोविड वर्किंग ग्रुपचे सदस्य डॉ. एन.के अरोरा यांनी हा वैज्ञानिक तथ्याच्या आधारे घेतला घेतलेला निर्णय आहे, असे म्हणत या शक्यता नाकारल्या आहेत. ते म्हणाले की, यामुळे लसींचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार नाही, परंतु ते अधिक फायद्याचे आहे. गुरुवारीच सरकारने कोविशील्डच्या दोन लसींमध्ये 12 ते 16 आठवडे अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अंतर 6 ते 8 आठवडे ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

एका महिन्याच्या अंतराने ज्यांना आधीच लस दिली त्यांच्यावर या लसीचा कमी परिणाम होईल? असा प्रश्न देखील आहे. यावर उत्तर देताना एन.के अरोरा यांनी सांगितले असे नाही. एका वृत्त वाहिनीशी बोलताना अरोरा म्हणाले, “ज्यांनी एका महिन्यात किंवा दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दुसरी लस घेतली आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्या शरीरात अँटीबॉडीजचे चांगल्या तयार होतील. गुरुवारी, कोविड वर्किंग ग्रुपने कोविशील्डच्या लसीतील अंतर 6 ते 8 आठवड्यांऐवजी 12 वरून वाढवण्याची शिफारस केली. या ग्रुपची शिफारस सरकारने काही वेळातच मान्य केली. यासह लसींच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेतला गेला नाही, असे डॉ. अरोरा म्हणाले. जर आपण लसीमधील अंतर एक महिन्यापर्यंत वाढवले ​​तर काय फरक पडेल? यामुळेे केवळ 4 ते 6 कोटी डोसमध्ये फरक पडेल. म्हणूनच, एका महिन्याच्या विलंबामुळे लसींच्या कमतरतेमुळे दुसऱ्या डोसचा सामना करणे फार कठीण आहे.

First Published on: May 14, 2021 3:47 PM
Exit mobile version