टोरोंटो येथे झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू तर १४ जखमी

टोरोंटो येथे झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू तर १४ जखमी

घटनेनंतरची परिस्थीती

कॅनडातील टोरोंटो येथे एका माथेफिरुने अंदाधुंद गोळ्या झाडल्या असून या घटनेत १ मुलीचा मृत्यू झाला तर १४ नागरिक जखमी झाले आहेत. टोरेंटोमधील ग्रीकटाउन परिसरात झालेल्या या घटनेनंतर पोलिसांकडून केलेल्या गोळीबारात या माथेफिरुचा मूत्यू झाला. मानसिक तणावामुळे त्याने गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. घटनेदरम्यान काही लोकांनी काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. “माथेफिरु आरोपीबरोबरच एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींमध्ये एक तरुणीची अवस्था गंभीर आहे.” – टोरोंटो पोलीस चिफ मार्क सॉन्डर्स

 

रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. परिसरात अधिक लोका असताना गोळीबार केल्यामुळे अनेकजण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. यापरिसरात असलेल्या हॉटेल्स आणि कॅफेमध्ये आलेल्या नागरिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा माथेफिरु खांद्याला बॅग लटकवून आला होता. माथेफिरुने डोक्यावर टोपी घातली होती. बॅगेतून बंदूक काढून त्याने फायरिंग केली. अचानक झालेल्या फाररिंगमुळे लोकांमध्यो गोंधळ निर्माण झाला. लोकांनी घटनास्थळावरुन पळ काढला असता त्याने धावणाऱ्यांवर गोळीबार केला.

गोळीबाराच्या वाढत्या घटना
मागील काही महिन्यांपासून युएसए आणि कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटनांचा आकडा वाढत चालला आहे. बंदूक बाळगण्याची परवानगी असल्यामुळे अनेक माथेफिरू अंदाधुंद गोळीबार करतात. अशा घटनांमध्ये गोळीबार करणारा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. अशा माथेफिरूंना आत्महत्या करायची असल्यास अशा प्रकारचा गोळीबारकरुन ते आपलं जिवन संपवतात.

 

First Published on: July 23, 2018 3:51 PM
Exit mobile version