गोव्यात आजपासून पर्यटकांना प्रवेश!

कळंगुट बीच, गोवा (सौजन्य- हेराल्ड गोवा)

भटकंतीसाठी पर्यटकांची पहिली पसंती असणाऱ्या गोवा राज्यात आजपासून पर्यटकांना प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन व्हावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे सर्व प्रकारचे स्थलांतर थांबले होते. मात्र आता हळूहळू देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच गोवा सरकारनेही बाहेरील पर्यटकांना राज्यात येण्याची परवानगी दिली आहे. मात्र सर्वांना कोरोनाची चाचणी करूनच राज्यात प्रवेश मिळणार आहे. तसेच इतरही नियमांचे पालन त्यांना करावे लागणार आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी संदर्भात माहिती दिली. असे असले तरी परदेशातील पर्यटकांना मात्र अद्याप गोव्यात येता येणार नाही, असेही ते म्हणाले.

एकदा कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्याने पर्यटन खुल करण्याचे निश्चित केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी यांची घोषणा केली. राज्य सरकारने जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या २५० हॉटेल्सला पर्यटन विभागाकडून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत मनोहर अजगावकर यांनी सांगितले की, ‘गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचे हॉटेलमधील राहण्याचे बुकिंग अगोदरच करावे लागणार आहे. त्यानंतर ते पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल. त्याचबरोबर पर्यटकांना गोव्यात दाखल होताना करोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. तसेच प्रमाणपत्र नसल्यास अशा पर्यटकांची चाचणी सीमेवरच चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत राज्य सरकारच्या वतीने त्यांना क्वॉरंटाईन ठेवले जाईल.’ दरम्यान, ज्या पर्यटकांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी दिली जाईल अथवा गोव्यातच उपचार घेण्याचा पर्यायही असणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –

नालासोपाऱ्यात गुंडांचा हैदोस; मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर तलवार हल्ला

First Published on: July 2, 2020 2:40 PM
Exit mobile version