Toyota च्या 2.96 लाख ग्राहकांचा डेटा लीक; अनेकांना स्कॅम ईमेल येण्याची शक्यता

Toyota च्या 2.96 लाख ग्राहकांचा डेटा लीक; अनेकांना स्कॅम ईमेल येण्याची शक्यता

भारतासह जगभरातील अनेक बड्या कंपन्यांच्या ग्राहकांचा डेटा लीक होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यात टोयाटा या वाहन विक्री करणाऱ्या कंपनीबाबतही तिच घटना घडली आहे. ज्यामुळे टोयोटा वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. टोयोटाच्या लाखो ग्राहकांची खाजगी माहिकी लीक झाली आहे. याबाबत कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती देत माफी मागितली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने शुक्रवारी अधिकृत वेबसाईटवरून डेटा लीकची माहिती देत सांगितले की, T – Connect सेवा वापरणाऱ्या सुमारे 296,000 ग्राहकांची माहिती लीक झाली आहे.

दरम्यान टोयोटाने ग्राहकांना याची माहिती देत सतर्कतेसाठी एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले की, डेटा लीक झाल्यानंतर अनेक ग्राहकांना त्यांच्या ईमेल आयडीवर स्पॅम, फिशिंग स्कॅम किंवा अनोखळी ईमेल येण्याची शक्यता आहे. या सर्वापासून कंपनीने ग्राहकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

टोयाटाने दिलेल्या माहितीनुसार, T-Connect सेवा वापरणाऱ्या एकूण 296,019 ग्राहकांचे ईमेल आणि यूजर नंबर लीक झाले आहेत. T-Connect ही एक टेलिमॅटिक्स सेवा देणारी कंपनी असून जी कार आणि कारचालकाला नेटवर्कद्वारे कनेक्ट ठेवते. मात्र हीच सिस्टम हॅक करत डेटा लीक केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान कंपनीने ग्राहकांची नावं, फोन नंबर किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित कोणताही माहिती लीड झाली नसल्याची शक्यता वर्तवली आहे, मात्र टी- कनेक्ट सेवेत युजर्सची अनेक वैयक्तिक माहिती असते, त्यामुळे ती लीक झालीच असणार असा दावा आता युजर्स करत आहेत.

कंपनीच्या माहितीनुसार, कंपनीने पुष्टी केली की, T-Connect यूजर्सचा साईट सोर्स कोडचा भाग (text describing computer processing) GitHub (software development platform) प्रकाशित झाला आहे. यावर अशी माहितीसमोर आली की, कंपनीच्या डिसेंबर 2017 ते 15 सप्टेंबर 2022 च्या ग्राहकांचा सोर्स कोडचा भाग लीक झाला आहे. ज्यानंतर कंपनीने GitHub वर यूजर्सचा साईट सोर्स कोड ताबडतोब खाजगी केल्याचे सांगितले आहे.


… तेव्हा बाप म्हणून उद्धव ठाकरेंच्या मनाला काय वाटलं असेल? किशोरी पेडणेकरांचा शिंदेंना प्रतिसवाल

First Published on: October 8, 2022 7:08 PM
Exit mobile version