रुळाला गेला तडा तरी ट्रेन धावत राहिल्या; गोरखपूरमध्ये धक्कादायक प्रकार

रुळाला गेला तडा तरी ट्रेन धावत राहिल्या; गोरखपूरमध्ये धक्कादायक प्रकार

प्रातिनिधिक छायाचित्र

कुशीनगर: रुळाला तडा जाऊनही त्यावरुन ट्रेन धावत राहिल्याची घटना गोरखपूर येथे घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. यामुळे रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. कारण रुळाला तडा गेला व त्यावरुन किती ट्रेन धावल्या याची माहिती रेल्वे प्रशासनाकडे नाही.

गुरुवारी सकाळी ८ च्या सुमार हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथील पनियहवा स्थानकाच्या परिसरात ही घटना घडली. काही मुले पनियहवा पुलाजवळ गेली होती. त्यावेळी तेथून एक ट्रेन गेली. ही ट्रेन जात असताना विचित्र आवाज आला. त्यामुळे ही मुले रुळाजवळ गेली. तेथे रुळाला तडा गेल्याचे मुलांच्या निदर्शनास आले. हा प्रकार बघताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी जीआरपी व आरपीएफला याबाबत कळवण्यात आले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्व अधिकारी वर्ग आश्चर्यचकीत झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ रुळाची दुरुस्ती केली. महत्त्वाचे म्हणजे ही घटना कधी घडली. तडा गेलेल्या रुळावरुन किती गाड्या धावल्या याची माहिती रेल्वे प्रशासनाकडे नाही. लोकांमध्ये उलटसुलट चर्चा झाली. मात्र ही घटना सामान्य आहे, असा अजब दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

तडा गेलेल्या रुळावरुन सप्तक्रांती एक्स्प्रेस गेली. त्यानंतर नरकटियागंजला गोरखपूरहून जाणारी रेल्वेही तडा गेलेल्या रुळावरुन गेली. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे स्टेशन मास्तर मनोज कुमार यांनी ही घटना सामान्य असल्याचा दावा केला. ते म्हणाले, तडा गेलेल्या रुळावरुन किती गाड्या धावल्या याची माहिती रेल्वे प्रशासनाकडे नाही. पण रुळाची दुरुस्ती करण्यात आली आहे. रूळाला तडा गेल्याने जीवित नाही झालेली नाही. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले नाही. रेल्वे सेवा सुरळीत सुरु होती.

याआधीही १५ वर्षांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. सोनबरसा येथे ही घटना घडली होती. रुळाची एक प्लेट अचानक सरकली होती. रेल्वे प्रशासनाने त्याची दुरुस्ती केली होती.

First Published on: December 15, 2022 5:22 PM
Exit mobile version