वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त देण्याची अतिघाई नडली

वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त देण्याची अतिघाई नडली

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर सध्या नवी दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. पण, जिवंतपणी अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी ट्विट करत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. पण, आपण केलेली अक्ष्यम चुक लक्षात येताच तथागत रॉय यांनी ट्विट डीलीट केले. शिवाय माफी देखील मागितली. यावेळी त्यांनी मी टिव्ही चॅनल पाहिल्यानंतर ट्विट केल्याचे स्पष्टीकरण दिले. एकीकडे संपूर्ण देश अटलबिहारी वाजपेयींच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. तर. दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. हा प्रकार म्हणजे जिवंतपणीचं श्राद्ध घालण्याचा प्रकार नाही का?

त्रिपुरा राज्याचे राज्यपाल यांनी चुकून केलेले ट्विट

वृत्तवाहिन्यांकडून देखील खोडसाळ वृत्त

अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याची बातमी अनेक वृत्तवाहिन्यांनी दिली. सर्वप्रथम डीडी वृत्तवाहिन्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे वृत्त प्रसारीत केले. त्यानंतर प्रत्येक वृत्तवाहिनीनी अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाचे वृत्त दिले. पण, आपण केलेली चुक लक्षात येताच वृत्तवाहिन्यांनी वाजपेयींच्या निधनाचे वृत्त मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. सर्वात आधी बातमी देण्याच्या स्पर्धेमध्ये आजकाल कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात. त्याचे हे उत्तम उदाहरण!

प्रकृती नाजूक

अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर सध्या दिल्लीतील AIIMS रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी एम्समध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सध्या अटलबिहारी वाजपेयी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

First Published on: August 16, 2018 4:52 PM
Exit mobile version