‘या’ राज्यात करोना व्हायरसमुळे गेला पहिला बळी

‘या’ राज्यात करोना व्हायरसमुळे गेला पहिला बळी

कोरोना व्हायरस

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत होत आहे. मात्र, असे एक राज्य आहे. त्या राज्यात पहिल्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्रिपुरामध्ये मंगळवारी कोरोना व्हायरसमुळे आगरतला येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने या व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. करोनामुळे गेलेला हा त्रिपुरामधील पहिला बळी ठरला आहे.

चाचू बाजार या गावातील घटना

पश्चिम त्रिपुरातील चाचू बाजार या गावातील एका व्यक्तीला १ जून रोजी अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्या व्यक्तीला जीबी पंत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या व्यक्तीची कोरोनाची तपासणी करण्यात आली. दरम्यान, ३ जून रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. या व्यक्तीवर उपचार देखील सुरु होते. पण, मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राज्याचे कायदा आणि शिक्षणमंत्री रतनलाल नाथ यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

‘त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी यापूर्वी केलेल्या घोषणेप्रमाणे मृताच्या कुटुंबियांना १० लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल’, अशी माहितीही नाथ यांनी दिली. राज्यात करोनामुळे पहिला मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनीही ट्विटरद्वारे दुःख व्यक्त केले आहे.
‘आमच्या डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांचा जीव वाचवण्यात अपयश आले’, अशी माहिती देब यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

दरम्यान, मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये जवळपास ८०० कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यातील १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ६०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – याला म्हणतात डोकॅलिटी! लॉकडाऊनमध्ये लग्नासाठी शोधली भन्नाट पळवाट!


First Published on: June 10, 2020 1:38 PM
Exit mobile version