निवडणुकांपूर्वी शक्तीप्रदर्शनाचा जोर, ‘मेगा रॅली’ची चर्चा

निवडणुकांपूर्वी शक्तीप्रदर्शनाचा जोर, ‘मेगा रॅली’ची चर्चा

TRS चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री- के.चंद्रशेखर राव

देशभरातील राजकीय पक्षांमध्ये निवडणूंकाच्या पार्श्वभूमीवर जाहिरातबाजीला आणि प्रचाराला सुरुवात झाली आहे. याच धर्तीवर तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी टी.आर.एस (तेलंगणा राष्ट्रीय समिती) या सत्ताधारी पक्षाने आपल्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात केली आहे. टी.आर.एसने आज (रविवारी) एका मेगा रॅलीचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे ही आजवरची सर्वात मोठी प्रचार रॅली असल्याची चर्चा सुरु आहे. या रॅलीच्या माध्यमातून निवडणुकांपूर्वीचे काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. TRS चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे या मेगा रॅलीदरम्यान मंत्रीमंडळाशी निगडीत काही महत्वाचे निर्णय घोषित करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकंदरच टीआरएसच्या मेगा रॅलीची सध्या तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. टीआरएसच्या या मेगा रॅलीच्या तयारीची ही झलक तुम्हीही पाहा:

व्हिडिओ सौजन्य- युट्यूब

दरम्यान तेलंगणा राज्य मंत्रीमंडळानी राज्यपास ई.एल.एस नरसिंहन यांना एक प्रस्ताव दिला आहे. ज्यानुसार मंत्रीमंडळ बरखास्त करण्याची विनंती करण्यात आल्याचं समजतंय. या प्रस्तावास निवडणूक आयोगाने होकार दिल्यास येत्या डिसेंबर महिन्यात अन्य ३ राज्यांसोबतच तेलंगणा राज्याच्या निवडणुकाही होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर आजच्या ही मेगा रॅली खूप महत्वाची असल्याचं मानलं जात आहे. आता या रॅलीमधून कोणते मोठे निर्णय जाहीर होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

First Published on: September 2, 2018 10:58 AM
Exit mobile version