अमेरिकेने भारतीय आयटी व्यावसायिकांना दिला झटका, एच १-बी व्हिसा केला निलंबित

अमेरिकेने भारतीय आयटी व्यावसायिकांना दिला झटका, एच १-बी व्हिसा केला निलंबित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच १ -बी व्हिसा निलंबित करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतासह जगातील आयटी व्यावसायिकांना मोठा झटला बसला आहे. हे निलंबन या वर्षाच्या शेवटपर्यंत वैध असणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णय अमेरिकन कामगारांच्या हितासाठी घेण्यात आला आहे.

सध्या आर्थिक संकटामुळे नोकरी गमावलेल्या अमेरिकन लोकांना मदत करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आवश्यक असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अगोदर ही घोषणा करताना ट्रम्प यांनी विविध व्यावसायिक संघटना, कायदेशीर आणि मानवाधिकार संस्था यांच्याद्वारे येणाऱ्या आदेशाकडे कानाडोळा केला आहे.

२४ जूनपासून हे निलंबन लागू होणार आहे. याच परिणाम मोठ्या प्रमाणात भारतीय आयटी व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. आता त्यांना स्टॅम्पिंगपूर्वी वर्षाच्या अखेरपर्यंत थांबावे लागेल. ज्यांना एच १-बी व्हिसा नूतनीकरण करण्याची इच्छा असलेल्या भारतीय आयटी व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जगभरातील २.४ लाख लोकांना धक्का बसू शकेल. अमेरिकेत काम करणाऱ्या कंपन्यांना परदेशी कामगारांकडून मिळालेल्या व्हिसाला एच १-बी व्हिसा म्हणतात. या व्हिसा निश्चित कालावधीसाठी दिला जातो.

एच १-बी व्हिसा म्हणजे काय?

एच १-बी व्हिसा हा प्रवासी नसलेला व्हिसा आहे. अमेरिकेत काम करणार्‍या कंपन्यांना हा व्हिसा अमेरिकेत कमतरता असलेल्या कुशल कर्मचार्‍यांना ठेवण्यासाठी दिला जातो. या व्हिसाची वैधता सहा वर्षांची आहे. अमेरिकन कंपन्यांच्या मागणीमुळे भारतीय आयटी व्यावसायिकांना हा व्हिसा सर्वाधिक मिळतो.

First Published on: June 23, 2020 8:48 AM
Exit mobile version