टीव्ही आणि अन्य विद्युत उपकरणे महागणार!

टीव्ही आणि अन्य विद्युत उपकरणे महागणार!

विद्युत उपकरणे महागणार

महागाई आता काही नवी राहिलेली नाही. रोज पेट्रोल- डीझेलच्या भावातले चढ- उतार आणि घरगुती गॅसच्या भडकणाऱ्या किंमतींमुळे सामान्य नागरीकांच्या खिशाला कात्र लावली आहे. आता यात भर म्हणून की काय टीव्ही आणि अन्य विद्युत उपकरणाच्या दराचा भडका उडणार आहे. तब्बल १० टक्क्यांनी ही दरवाढ होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही टीव्ही, फ्रिज सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

का वाढणार किंमती ?

गेल्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि वाढलेल्या कस्टम ड्युटीमुळे ही भाववाढ होणार आहे. ही वाढ १० टक्के इतकी होणार आहे. खरंतर सगळ्याच कंपन्यांनी ऑक्टोबरपासून भाववाढ करण्याचे निश्चित केले होते. परंतु सणांमुळे ही भाववाढ काही काळ रोखून ठेवण्यात आली. पण आता दिवाळी देखील संपली आहे. त्यामुळे आता ही भाववाढ तातडीने लागू करण्यात येणार आहे.

काय महागणार ?

टीव्ही, प्रिमिअम वॉशिंग मशीन, फ्रिज यांच्या किंमतीमध्ये प्रामुख्याने ही वाढ होणार आहे. या तयार करणाऱ्या LG, SAMSUNG आणि SONY या कंपन्यांनी कोणत्याही वस्तूच्या खरेदीवर दिले जाणारे १० टक्क्यांचे डिस्काऊंट आधीच बंद केले आहेत. आता BOSH, SEMENS, HAIER, GODREJ या कंपन्यादेखील आपल्या वस्तूंच्या किंमती वाढवणार आहेत . खरंतर या किंमती सप्टेंबरमध्ये वाढणे अपेक्षित होते. पण तसे

First Published on: November 19, 2018 2:11 PM
Exit mobile version