ट्विटरकडून ANI हॅंडल ब्लॉक; under age चा ठेवला ठपका

ट्विटरकडून ANI हॅंडल ब्लॉक; under age चा ठेवला ठपका

नवी दिल्लीः ट्विटरने ANI चे हॅंडल ब्लॉक केले आहे. under 13 years of age चा ठपका ठेवत bad news म्हणून ट्विटरने ही कारवाई केली. ANI चे ७.६ मिलिनियन फोलोअर्स आहेत. दोन दिवसांपूर्वी ट्विटरने चुकीची माहिती पसरवणारी तब्बल १६ लाख खाती बंद केली.

ANI च्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी त्यांच्या खासगी अकाऊंटवरुन हे ट्वीट केले.   ANI चे खाते पुन्हा सुरु होत नाही तोपर्यंत एएनआय डिजिटल आणि एहिंदीन्यूज या ट्विटर हॅंडलवर बातम्या बघता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एनडीटीव्हीचेही ट्विटर हॅंडल बंद करण्यात आले आहे. ही खाती पुन्हा सुरु होण्यासाठी २४ तासांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. अकाऊंट बंद करण्याआधी ANI ची गोल्ड टीक हटवून ब्ल्यू टीक करण्यात आली होती. त्यांनतर ट्विटरने ANI चे अकाऊंटच बंद केले, अशी माहिती संपादक स्मिता प्रकाश यांंनी दिली.

 

आपल्या ट्विटरच्या खात्यांचा गैरवापर करणे, हॅक केलेली माहिती किंवा कॉपी केलेली माहिती, अश्लील फोटो, हिंसा पसरवणारी माहिती, वैयक्तिक अशी माहिती ज्यामुळे समाजातील लोकांमध्ये त्याबाबतची चुकीची माहिती पोहोचली जाईल अशा खाते धारकांची खाती ट्विटरकडून बंद करण्यात आलेली आहेत. याआधी सुद्धा ट्विटरने अनेकांची खाती बंद केलेली आहेत. जानेवारी ते जून 2022 या कालावधीत ट्विटरकडे 65 लाख आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आलेली होती. ज्यामुळे याकडे गांभीर्याने पाहात ट्विटरने तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक ट्विटर अकाउंटवर कारवाई केली.

First Published on: April 29, 2023 7:48 PM
Exit mobile version