ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले ‘फॅक्ट-चेक’ करायला

ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले ‘फॅक्ट-चेक’ करायला

ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले 'फॅक्ट-चेक' करायला

अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत ९८ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. या कोरोनाच्या संकटात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर सतत आरोप करताना दिसत आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने पहिल्यांदा इशारा दिला आहे. त्यांच्या काही ट्विटसना फ्लॅग करत फॅक्ट-चेकचा इशारा दिला आहे. यानंतर हे बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत ट्विटरने हस्तक्षेप केल्याचे देखील ट्रम्प म्हणाले आहेत.

मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन ट्विटवरुन ट्विटरने इशारा दिला. मेल इन बॅलेटसला बनावट आणि ‘मेल बॉक्स लुटले जातील’ असे सांगून ट्रम्प यांनी अधिकृत अकाऊंटवरून काही ट्विटस केले होते. पण आता ट्रम्प यांच्या या ट्विटवर लिंक येत आहे. त्यावर तथ्य जाणून घेण्यास सांगितले जात आहे.

दरम्यान ट्विटरने इशारा दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पने ट्विटरबाबत पुन्हा दोन ट्विट केले आहेत. ते म्हणाले की, ‘२०२०च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत ट्विटर हस्तक्षेप करीत आहे. ते मेल-इन बॅलेटसंदर्भात माझे विधान फेक असल्याचे सांगत आहे. पण हे चुकीचे आहे. ही फेक बातमी सीएनएन आणि अॅमेझॉन वॉशिंग्टन पोस्टच्या तथ्य तपासणीवर आधारित आहे.’ तर दुसऱ्या ट्विटमध्ये ट्रम्प म्हणाले की, ‘ट्विटर बोलण्याच्या स्वातंत्र्यावर दबाव आणत आहे. मी राष्ट्राध्यक्ष म्हणून हे होऊ देणार आहे.’


हेही वाचा – हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे धोका नाही; WHO च्या बंदीनंतर ICMR दिलं स्पष्टीकरण


 

First Published on: May 27, 2020 8:27 AM
Exit mobile version