ट्विटरचे नवे फिचर : फक्त बोलून करता येणार ‘ट्विट’

ट्विटरचे नवे फिचर : फक्त बोलून करता येणार ‘ट्विट’

माइक्रो ब्लाॅगिंग साईट ट्विटरने आपल्या यूजर्ससाठी एक खास नवीन ‘व्हॉइस रेकॉर्ड फिचर’ लाॅन्च केले आहे. यूजर्स या फीचरव्दारे आपला आवाज रेकॉर्ड करून ट्विट करू शकणार आहे. त्यामुळे यूजर्सचा वेळ वाचणार आहे. दरम्यान, सध्या कंपनीने हे फिचर फक्त आयओएस यूजर्ससाठी लाॅन्च केले आहे, त्यामुळे अँड्रॉइड यूजर्सला त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

ट्विटरचे व्हाॅइस फीचर काय आहे

कंपनी याबाबत ट्विट करताना म्हटले आहे की, आम्ही सध्या व्हाॅइस फीचर हे फक्त आयओएस (iOS ) यूजर्ससाठी लाॅन्च केले आहे. यूजर्स १४० सेंकद पर्यंत आवाज (व्हाॅइस) रेकॉर्ड करून ट्विट करू शकतात. याशिवाय या ट्विटमध्ये एक व्हिडीओसुध्दा शेअर केला आहे, ज्यामध्ये हे फीचर कसे काम करते याबाबत माहिती दिली आहे.

कसं वापराल हे नवीन व्हाॅइस फीचर

ट्विटव्दारे पोस्ट केलेल्या व्हिडीओनुसार, जर तुम्ही तुमच्या आवाजात ट्विट करू ईच्छिता तर सर्व प्रथम न्यू पोस्ट वर टॅप करा. तिथे कॅमेऱ्याच्या बाजूला तुम्हाला ऑडिओ रेकाॅर्ड हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा आणि आवाज रेकॉर्ड करा. त्यानंतर डन बटणावर टॅप केल्यास तुमचे रेकॉर्ड केलेले ट्विट शेअर होईल.

एकाचवेळी टेक्स्ट व व्हाईस नोट करता येईल

तसेच तुम्ही व्हॉइस ट्विट फीचरमध्ये व्हॉइस नोटला नेहमीच्या टेक्स्ट ट्विटसोबत अ‍ॅड करून देखील ट्विट करू शकता. म्हणजे एकाच ट्विटमध्ये टेक्स्ट आणि व्हॉइस नोट दोन्ही वापरता येईल.

First Published on: June 19, 2020 5:10 PM
Exit mobile version