गोव्यात कारचा भीषण अपघात; तीन ठार

गोव्यात कारचा भीषण अपघात; तीन ठार

उत्तर गोव्यातील चोपडे-शिवोली पुलावर दोन कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीनजण जागीच ठार झाले आहेत. बसला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे. हे तीघेही पेर्णेम येथील रहीवासी आहेत.


एसयुव्ही कार बार्देस आणि पेर्णेम तालुक्याला जोडणाऱ्या पुलावर एका बसला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या कारवर आदळली. यामध्ये एका कार्यक्रमाला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीत मृत्यू झाला. तोपर्यंत एसयुव्हीचा चालक पळून गेला आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने अपघातग्रस्त कार जाळली. त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.अग्निशमन दलाने आग विझवली आहे.

First Published on: June 16, 2019 1:24 PM
Exit mobile version