Kidney Transplant: लोहिया संस्थानात दोन वेगळ्या रक्तगटाची किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Kidney Transplant: लोहिया संस्थानात दोन वेगळ्या रक्तगटाची किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Kidney Transplant: लखनऊमध्ये विभिन्न रक्तगटाच्या किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

देशभरात किडनीची गरज असलेले अनेक लोक किडनी डोनरची वाट पाहत आहेत. अनेकांकडे किडनी विकत घेण्यासाठी पैसे नाही तर अनेक जण आपल्या रक्तगटाला जुळणाऱ्या किडणीच्या प्रतिक्षेत आहेत. आजही देशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तगट जुळणाऱ्या किडनीसाठी वाट पाहत आहेत. सेम रक्तगटाची किडनी मिळाल्यास शरीरातील इतर अवयवांसोबत मॅच होण्यास मदत होते. मात्र लोहिया आयुर्विज्ञान संस्थाने किडनी ट्रान्सप्लांटमध्ये नवीन प्रयोग केला आहे. विभन्न रक्तगटाचे मूत्राशयाची प्रत्यारोपण शत्रक्रिया करण्यात यश आले आहे. लोहिया आयुर्विज्ञान संस्थानने लखीमपूर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणावर ही शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे.

नेफ्रोलॉजी विभागाध्यक्ष डॉ. अभिलाष चंद्रा यांनी तरुणाची तपासणी केली त्यावेळीस त्यांना रुग्णाची किडणी फेल झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्याला किडणी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर किडणी देणाऱ्या रुग्णाच्या ४६ वर्षीय आईची तपासणी करण्यात आली. मात्र आई आणि मुलाचा रक्तगट हा वेगवेगळा होता. रुग्णाचा बी रक्तगट होता तर किडणी देणाऱ्या आईचा एबी हा रक्तगट होता. दोन विरुद्ध रक्तगटाच्या कडणी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आणि हा प्रयोग यशस्वी करण्यात त्यांना यश आले.

डॉ. अभिलाष चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र त्यांची माहिती रुग्ण पूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर देण्यात आली. दोन वेगळ्या रक्तगटांच्या किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारा हा पहिलाच प्रयोग होता आणि हा प्रयोग यशस्वी झाला असून रुग्ण आता पूर्णपणे रिकव्हर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे डॉ. अभिलाष चंद्रा यांनी असे म्हटले की, समान रक्तगट असलेल्या रुग्णांची किडणी प्रत्यारोपण झाल्यानंतर त्याची रिकव्हरी फार जलद होते. रुग्ण दोन दिवसांआधी रुग्णालयात दाखल झाल्यास पुढील दहा दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो. मात्र दोन विभन्न रक्तगटातील किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया फार दिवस सुरू राहते. रुग्णाला दोन आठवड्यांआधी रुग्णालयात दाखल करण्यात येते. त्यानंतर त्याच्या शरीरातील अँटिबॉडीज काढण्यात येतात. त्यानंतर त्याला इम्युनोग्लोबिन सारखी औषधे दिली जातात. हा वेगळा प्रयोग करण्यासाठी रुग्णालय आणि डॉक्टरांची संपूर्ण टीममुळे करणे शक्य झाले आहे. लोहिया रुग्णालयात आतापर्यंत एकूण १०२ किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.


हेही वाचा – mix match covid vaccine : अमेरिकेत फायझर, मॉर्डन आणि J&J लसींच्या booster डोसला परवानगी

First Published on: October 21, 2021 2:49 PM
Exit mobile version