VIDEO: वळूचा वाटसरुंवर हल्ला; दोन जण जखमी

VIDEO: वळूचा वाटसरुंवर हल्ला; दोन जण जखमी

वळूचा वाटसरुंवर हल्ला

गुजरातच्या राजकोटजवळ एका मोकाट वळूने दोन जणांवर हल्ला केला आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना या वळून लक्ष्य केले आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका सायकल स्वारला आणि बाईकवरुन जाणाऱ्या एका तरुणाला या वळून जखमी केले आहे. वळूच्या हल्ल्यामध्ये एक वयोवृध्द जखमी झाला आहे. या वळूचा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर वळूला पकडून त्याला एका गोशाळेमध्ये नेण्यात आले.

अशी घडली घटना 

वळूने केलेल्या हल्ल्याची घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. गल्लीच्या एका कोपऱ्याला उभा असलेल्या भलामोठा वळूने आधी सायकलवरुन जात असलेल्या वयोवृध्दावर हल्ला केला. आधी वळूने त्यांच्या सायकलला धडक देऊन त्यांना खाली पाडले. खाली पडलेले वयोवृध्द तिथेच उभे राहिले. त्यानंतर वळूने त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला. त्याना थेट एका घराच्या भिंतीवर आदळले. यामध्ये वयोवृध्द जखमी झाले. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने या वळूच्या अंगावर पाणी टाकून त्याला हकलवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमी वयोवृध्दाला ही व्यक्ती आपल्यासोबत घेऊन गेली.

वळूची रवानगी गोशाळेत

त्यानंतर अवघ्या १० मिनिटानंतर वळूने परत दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. याच रस्त्यावरुन बाईकवरुन जाणाऱ्या तरुणाच्या बाईकवर वळूने जोरदार धडक दिली. त्यामध्ये हा तरुण देखील बाईक घेऊन खाली पडला. त्यानंतर हा तरुण त्याच ठिकाणी बाईक ठेवून तो निघून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर या वळूला पकडून त्याला थेट गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे.

First Published on: June 19, 2019 7:42 PM
Exit mobile version