एक्स्प्रेस-लोकलची समोरासमोर धडक; मोटरमन एक्स्प्रेसमध्ये अडकला

एक्स्प्रेस-लोकलची समोरासमोर धडक; मोटरमन एक्स्प्रेसमध्ये अडकला

आज सोमवारी तेलंगणातील काचेगुडा रेल्वेस्थानकात भीषण अपघात घडला आहे. एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेन समोरासमोर धडकल्या. या दुर्घटनेत जवळपास ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेतील लोकलचा मोटरमन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अडकला आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

असा घडला अपघात

तेलंगणातील काचेगुडा रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस-लोकलमध्ये हा भीषण अपघात झाला. एमएमपीएस लोकल ट्रेन आणि कोंगू एक्स्प्रेस समोरासमोर धडकल्या. या धडकेनंतर ट्रेनचे डबे रुळांवरुन घसरले. हा अपघात कसा झाला? याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३० जणांवर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत आहे. दरम्यान लोकल ट्रेनचा मोटरमन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: November 11, 2019 1:27 PM
Exit mobile version