पाकिस्तानात रेल्वेचा भीषण अपघात;१० ठार ५० जखमी

पाकिस्तानात रेल्वेचा भीषण अपघात;१० ठार ५० जखमी

पाकिस्तानच्या पूर्व पंजाब भागातील दोन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये १० जण जागीच ठार झाले असून ५० जण गंभीर जखमी झाले आहे. सादिकबाद तहसील भागातील वल्हार रेल्वे स्थानकावर एका मालगाडी अकबर एक्सप्रेसला धडक दिली. या घटनेमध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याने या मृतांमध्ये ९ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.

रेल्वेगाडीतील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू

या झालेल्या रेल्वे अपघातामध्ये अकबर एक्सप्रेसचे इंजिन संपुर्ण नष्ट झाले असून रेल्वेच्या तीन बोग्यांचे मोठं नुकसान झाले आहे. या भीषण अपघातातील गंभीर जखमींना सादिकबाद आणि रहिम यार खान या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातील जखमींना त्वरीत मदतकार्य देण्यात आले असून रेल्वेगाडीतील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान तसेच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी या दुर्घटनेनंतर दुःख व्यक्त करत या घटनेतील मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने काम सुरू करण्यास इमरान खान यांनी सांगितले असून, रेल्वे मंत्र्यांनीही या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले.

First Published on: July 11, 2019 1:54 PM
Exit mobile version