श्रावणातल्या पहिल्या सोमवारी बिहारमधील महेंद्रनाथ मंदिरामध्ये चेंगराचेंगरी, दोन महिलांचा मृत्यू

श्रावणातल्या पहिल्या सोमवारी बिहारमधील महेंद्रनाथ मंदिरामध्ये चेंगराचेंगरी, दोन महिलांचा मृत्यू

बिहारमधील सिवानमध्ये श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शिव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान तिथे उपस्थित दोन महिलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सिवान येथील महेंद्रनाथ मंदिरामध्ये शिव पिंडीला जलाभिषेक करताना झाली आहे. मिडीयारिपोर्ट्सच्या माहितीनुसार, पहिल्या श्रावण सोमवारी भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी व पूजा करण्यासाठी अनेक भाविक मंदिरात दाखल झाले होते. मात्र, यावेळी अचानक शिवालयात दर्शनासाठी लागलेल्या रांगेत चेंगराचेंगरी झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला.

या मृत्यू झालेल्या महिलांपैकी एका महिलेचे नाव सोहागमती तर दुसऱ्या महिलेचे नाव लीलावती असं आहे. शिवपिंडी होत असलेल्या जलाभिषेका दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर महेंद्रनाथ मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच यावेळी अनेकजण जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. जखमी झालेल्या लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, पहिल्या सोमवारी महेंद्रनाथ मंदिरामध्ये भाविक जलाभिषेक करण्यासाठी मंदिरात दाखल झाले होते. हे महेंद्रनाथ मंदिर या परीसातील खूप जागृक देवस्थान मानले जाते, त्यामुळे या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात. या धक्कादायक घटनेनंतर परीसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून पोलिसांची फैज या ठिकाणी दाखल झाली आहे. पोलिस याठिकाणी जमलेली गर्दी नियंत्रणात आणत आहेत.


हेही वाचा :“तुम्ही सहकार्य केल्यास चांगले निर्णय…”; संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी नरेंद्र मोदींचे खासदारांना आवाहन

First Published on: July 18, 2022 11:15 AM
Exit mobile version