नोटबंदीला दोन वर्षे पूर्ण!

नोटबंदीला दोन वर्षे पूर्ण!

नोटबंदीला चार वर्षे पूर्ण!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. याच नोटबंदीला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ला रात्री ८ वाजता नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रसारमाध्यमांसमोर येऊन नोटबंदिची घोषणा केली होती. त्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितले होते की, ‘रोजच्या चलनातील ५०० आणि १००० च्या नोटा रात्री बारा वाजेनंतर चलनातून बाद होणार आहेत’. त्यांच्या या घोषणेमुळे अनेकांना आश्चर्याचा धोका बसला होता. देशातील काळा पैसा बाहेर निघावा, यासाठी त्यांनी ही नोटबंदी केल्याचे सांगितले होते. नोटबंदी केल्यानंतर बॅंकामध्ये लोकांच्या लागलेल्या लांब रांगांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. मोदींच्या घोषणेनंतर आरबीआयने ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. आता या नोटबंदीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.

हेही वाचा – नोटबंदीचे २ वर्ष; सरकारचं डोकं ताळ्यावर नाही – अशोक चव्हाण

बॅंकेत अजूनही पूर्ण रक्कम जमा झाली नाही

रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) २०१६ आणि २०१७ या वित्त वर्षाच्या वार्षिक अहवालानुसार बाद झालेल्या नोटांपैकी ०.७ टक्के नोटा अजूनही बॅंकेत जमा झालेले नाही. त्यामुळे ही नोटबंदी फसली अशी टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. चलनातून बाद केलेल्या १००० आणि ५०० रुपयाच्या नोटांची एकूण किंमत १५.४४ लाख कोटी रुपये इतकी होती. परंतु, बॅंकेमध्ये यापैकी १५.३१ कोटी रुपये रक्कम परत आली. म्हणजेच एकूण रकमेपैकी ९९.३ टक्के रक्कम बॅंकेत पूर्ण आली. त्यामुळे, ०.७ टक्के रक्कम नक्की कुठे गेले, याचा पत्ता अजूनही लागलेला नाही.

हेही वाचा – नोटबंदीमध्ये मोदी सरकार पास जागतिक अहवालात प्रशंसा

डिजिटल ट्रॅन्झॅक्शन वाढले

नोटबंधी नंतर डिजिटल ट्रांजिक्शन मोठ्या प्रमाणात वाढली. नोटबंदीच्या काळात सुट्टेपैशांची कमतरता भासू लागल्यामुळे लोकांनी पेटीएम सारखे अॅप डाऊनलोड करुन पैशांचे ट्रॅन्झॅक्शन केले. काही दिवसांनी भारत सरकारने ट्रॅन्झॅक्शनसाठी BHIM अॅप सुरु केला. हा अॅपवर आतापर्यंत तब्बल ३ कोटी ७२ लाख लोकांनी डाऊनलोड केला आहे. त्यामुळे आता डिजिटल ट्रॅन्झॅक्शन वाढताना दिसत आहे.


हेही वाचा – नोटबंदी फसली! ९९.३० टक्के जुन्या नोटा बँकेत जमा

First Published on: November 8, 2018 11:09 AM
Exit mobile version