गजब MP! कोरोना पॉझिटिव्हसह निगेटिव्ह व्यक्तीला पोलिसांनी अडकवलं एकाच बेडीत!

गजब MP! कोरोना पॉझिटिव्हसह निगेटिव्ह व्यक्तीला पोलिसांनी अडकवलं एकाच बेडीत!

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना सर्वाधित बाधित असणाऱ्या राज्यात मध्यप्रदेश या राज्याचाही समावेश आहे. दरम्यान, मध्यप्रदेशातून एक असा प्रकार समोर आला आहे की, जो ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल. मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये जीआरपी पोलिसाने एका कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला दुसऱ्या निगेटिव्ह असणाऱ्या आरोपीला एकाच बेडीत अडकवलं आणि पायी वारी करत त्या दोघांना तुरुगांत आणलं. असे सांगितले जात आहे की, या दोघांवर चोरीचा आरोप होता. याच आरोपाबद्दल पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी पीपीई किट परिधान केलेल्या दोन पोलिसांनी या दोघं आरोपींना पोलिस स्टेशनपासून दोन किमी अंतरावर मध्यवर्ती कारागृहापर्यंत पायी चालवत नेलं.

असा घडला प्रकार

मोबाइल चोरीच्या प्रकरणात जीआरपीने खितौला येथे राहणाऱ्या दोन आरोपींना रविवारी पोलिसांनी अटक केली. यानंतर दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर तुरुंगात दाखल करण्याचे वॉरंट कोर्टाने त्या आरोपींना जारी केलं. सोमवारी दोन्ही आरोपींची जिल्हा व्हिक्टोरिया रुग्णालयात अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. कॉन्स्टेबल नन्हे लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन आरोपींपैकी एकाला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. तर दुसऱ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. यानंतर दोघांनाही जीआरपी पोलिस ठाण्यात नेण्यात आलं.

या प्रकरणी जीआरपीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दोघांनाही कोर्टात हजर केल्यानंतर दोघांची कोरोना टेस्ट झाली. यातील एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वाटेतच आमची पोलीस गाडी खराब झाल्याने या दोन्ही आरोपींनी चालत तुरुंगात नेले. ‘ आरोपींपैकी एक आरोपी नागपुरातील होता आणि त्याला तिथेच कोरोना संसर्ग झाला होता. तुरूंगात दाखल करण्यापूर्वी आरोपींची कोविड टेस्ट करणं आवश्यक असल्याने या दोघांना व्हिक्टोरियात आरटीपीसीआर करण्यासाठी पाठवण्यात आले होते. यांचा रिपोर्ट मिळाला नसल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांना पीपीई किटमध्ये पाठविण्यात आले होते, असे सांगितले जात आहे.

First Published on: April 13, 2021 12:45 PM
Exit mobile version