PNB Fraud Case: नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, ब्रिटनने प्रत्यार्पणास दिली मंजुरी

PNB Fraud Case: नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, ब्रिटनने प्रत्यार्पणास दिली मंजुरी

पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनमधून भारताकडे प्रत्योरोपित करावा, अशी मागणी भारताने काही महिन्यांपूर्वी केली होती. भारताची हिच मागणी ब्रिटनच्या कोर्टाने मंजूर केली होती. याचा सकारात्मक निर्णयानंतर आता नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी ब्रिटनने हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबतची माहिती सीबीआयने आधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात आहे.

पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा करून नीरव मोदी २०१८ साली भारतातून फरार झाला होता. मग त्यानंतर त्याला लंडन येथे मार्चमहिन्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. जेव्हापासून नीरव मोदी फरार झाला तेव्हापासून त्याला भारतात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते. हे प्रकरण ब्रिटनच्या कोर्टात देखील गेले होते. यावर्षी २५ फेब्रुवारीला ब्रिटन कोर्टाने नीरव मोदीला भारतात प्रत्यार्पण केले जाणार असल्याचा निकाल दिला होता. नीरव मोदीने कोरोनाच्या काळात त्याच्या मानसिक आरोग्याला धोका पोहोचू शकतो तसेच भारतीय कारागृहातील स्थिती पाहता नीरव मोदीच्या वकीलांनी बाजू मांडली होती. पण कोर्टाने हा दावा खोडून काढला. मानव अधिकारांना धरूनच त्याला भारताकडे प्रत्योरोपित करणे शक्य आहे, असा निकाल ब्रिटन कोर्टाने याप्रकरणात आदेश देताना स्पष्ट केला होता. आता ब्रिटन गृहमंत्रालयाने नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यास मंजुरी दिली आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी मुख्य आरोपी असून त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून मुंबईतील विशेष कोर्टाने घोषित केले होते. कोर्टाच्या या निर्णयानंतर देशातील आणि देशाबाहेरील मोदीची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

First Published on: April 16, 2021 6:52 PM
Exit mobile version