ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनची दहशत; २४ तासात १ हजार ५००हून अधिक लोकांचा मृत्यू

ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनची दहशत; २४ तासात १ हजार ५००हून अधिक लोकांचा मृत्यू

कोरोना व्हायरसचा कहर आटोक्यात येत असतानाच कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे जगभर एकच खळबळ उडाली आहे. या नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. यूकेमध्ये कोरोना संक्रमित लोकांची संख्या दररोज वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली असून मृत्यूची संख्या देखील वाढल्याचे समोर आले आहे. २४ तासात तब्बल १ हजार ५६४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

ब्रिटनमध्ये ४५ हजारांहून अधिक प्रकरण

यूकेमध्ये कोरोना संक्रमित लोकांची संख्या दररोज झपाट्याने वाढताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे ४५ हजारांहून अधिक प्रकरण समोर आली आहेत. त्यामुळे ब्रिटन हा जगातील पाचवा सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेला देश बनला आहे.

वर्ल्डोमीटरच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासात ४७ हजार ५२५ कोरोना रुग्ण आढळले असून १ हजार ५६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३२ लाख ११ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एकूण ३२ लाख ११ हजारहून अधिक लोकांना कोरोना झाला आहे. तर एकूण ८४ हजार ७६७ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच १४ लाख ६ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर यूकेमध्ये १७ लाख १९ हजार ८४२ active केसेस आहेत.


हेही वाचा – ब्रिटनपूर्वीच ‘या’ देशात कोरोनाच्या नवा स्ट्रेननं केली होती Entry!


 

First Published on: January 14, 2021 2:09 PM
Exit mobile version