Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने पंतप्रधान मोदींना मदत करण्याची केली विनंती

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने पंतप्रधान मोदींना मदत करण्याची केली विनंती

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने पंतप्रधान मोदींना मदत करण्याची केली विनंती

रशिया सतत युक्रेनवर हल्ला करत आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये युद्ध सुरू आहे. यादरम्यान युक्रेन सतत जगातील मोठ्या देशांना याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी मागणी करत आहे. रशिया हल्ल्यानंतर आता युक्रेनने भारताला मदतीसाठी हाक दिली आहे. युक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना हस्तक्षेप करण्यासाठी विनंती केली आहे. युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा (Dr Igor Polikha) म्हणाले की, ‘भारत आणि रशियाचे चांगले संबंध आहेत. नवी दिल्ली (भारत) रशिया-युक्रेन वाद नियंत्रित करण्यास महत्त्वाचे योगदान देऊ शकते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन ( Russian President Vladimir Putin) आणि आमचे राष्ट्रपती वलोडिमिर (President of Ukraine Volodymyr Zelenskyy) जेलेंस्कीसोबत संपर्क करावा.’

दरम्यान हल्ल्यासंदर्भात रशियाकडून येणाऱ्या वक्तव्याचे पोलिखा यांनी निषेध केला आहे. पोलिखा म्हणाले की, ‘फक्त लष्करी तळावर हल्ले होत असल्याचा रशिया दावा करत आहे. परंतु हल्ल्यात सर्वसामान्य लोकांचा मृत्यू होत आहे. बदल्यात युक्रेनने रशियाची पाचहून अधिक विमान पाडली आहेत. याशिवाय टँक आणि ट्रकांना घेराव घातला आहे.’

रशिया आणि युक्रेन वादावर भारत अजूनही तटस्थ आहे. म्हणजे युद्धात भारत अद्याप कोणाच्याही बाजूने नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडून आज सकाळी म्हटले की, ‘या युद्धात भारताची भूमिका तटस्थ आहे आणि शांततापूर्ण तोडगा निघण्याची आशा आहे.’ यापूर्वी संयुक्त राष्ट्राच्या आपात्कालीन बैठकीमध्ये भारताने म्हटले होते की, ‘युक्रेनमध्ये शिक्षण आणि कामासाठी गेलेल्या २० हजार भारतीय लोकांची आणि विद्यार्थ्यांची त्यांना चिंता आहे.’


हेही वाचा – Russia Ukraine War: रशियाने युक्रेनचे विमानतळ आणि लष्करी तळ केले उद्ध्वस्त; तर युक्रेनने रशियाची ५ विमानं पाडली


First Published on: February 24, 2022 3:09 PM
Exit mobile version