इस्रायल- इराणमध्ये युद्धाचे ढग! इस्रायलचा सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह दोन एअरपोर्ट इमारतींवर हल्ला

इस्रायल- इराणमध्ये युद्धाचे ढग! इस्रायलचा सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह दोन एअरपोर्ट इमारतींवर हल्ला

युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या युद्धाची धग कायम असताना. दुसरीकडे इस्रायल आणि इराणमध्येही युद्धाचे ढग जमा झाले आहेत. काल रात्री इस्रायलने सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह दोन एअरपोर्ट इमारतींवर हवाई हल्ला केल्याचा आरोप सीरियाने केला आहे. इस्रायलने घातक मिसाईल आणि शस्त्रास्त्रांच्या मदतीने इराण विमानतळांना लक्ष्य केल्याचा आरोप सीरियाने केला आहे. सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या हल्ला झाला, त्यानंतर राजधानी दमस्कसला लक्ष्य करण्यात आले, दरम्यान सोशल मीडियावर देखील हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सीरियाच्या स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, इस्रायलने तासाभरात दोन विमानतळांवर हवाई हल्ला केला, यावेळी इराणचे विमान उतरू नये यासाठी इस्रायलने अलेप्पो विमानतळाला लक्ष्य केल्याचा दावा इराणी मीडियाने केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळाचे मोठे नुकसान झाले आगे. हल्ल्याच्यावेळी विमानतळावर हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय होत त्यामुळे क्षेपणास्त्र रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान सीरियात हवाई हल्ला करण्यापूर्वी इस्त्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी अमेरिकेचे राष्ट्राधयक्ष जो बायडेन यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

सीरियन अरब न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, दमास्कसच्या ग्रामीण भागांत इस्रायली हल्ल्यांचा सामना करताना सीरियाने हवाई संरक्षणासाठी अनेक क्षेपणास्त्रे डागली. स्थानिक वेळेनुसार, रात्री 9.15 च्या सुमारास इस्रायलने उत्तर व्याप्त पॅलेस्टाईनमधील लेट टिबेरियासच्या दिशेने हल्ला केला आणि दमास्कसच्या आग्नेयेकडील काही ठिकाणांनाही लक्ष्य केले, इस्रायलच्या लष्करी सुत्रांच्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास इस्रायलने अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला, इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळाचं नुकसान झालं असलं तरी कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान यापूर्वी इस्रायलने दुसऱ्यांदा सीरियावर हवाई हल्ला केला. यापूर्वी इस्त्रायलनं अलेप्पोच्या नैऋत्येकडील मस्याफ येथील सीरियन सायंटिफिक स्टडीज अँड रिसर्च सेंटरवर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यात हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले,तर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले, गेल्या काही वर्षांत अलेप्पोजवळ इस्रायलने अनेक हवाई हल्ले केले आहेत.


उत्तर प्रदेशातील गंगा नदीत 25-30 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; दोघांचा मृत्यू

First Published on: September 1, 2022 11:43 AM
Exit mobile version