Ukraine Warns Russia: रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा वाद; ‘या’ कारणामुळे यूक्रेनने रशियाला दिला इशारा

Ukraine Warns Russia: रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा वाद; ‘या’ कारणामुळे यूक्रेनने रशियाला दिला इशारा

संयुक्त राष्ट्रामध्ये यूक्रेनचे राजदूत Sergiy Kyslytsya यांनी रशियाला डोनबास क्षेत्रात सैन्य तैनात करण्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाद्वारे संयुक्त निर्णायक प्रतिसादाचा इशारा दिला. यूक्रेनवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलत असताना Sergiy Kyslytsya म्हणाले की, ‘रशियाकडे डी-एस्केलेशन आणि राजनैतिक संवाद करण्याचा मार्ग किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाद्वारे एक संयुक्त निर्णायक प्रतिक्रियाचा अनुभव करण्याचा पर्याय आहे.’ दरम्यान डोनबासमध्ये यूक्रेन सरकारचे नियंत्रण असणाऱ्या क्षेत्रात रशियाने गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एका रशिया आणि यूक्रेनमधला तणाव वाढताना दिसत आहे.

Sergiy Kyslytsya पुढे म्हणाले की, ‘यूक्रेनला फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण युरोपसाठी शांतता, सुरक्षा आणि स्थिरता पाहिजे आहे. यादरम्यान मी पुन्हा सांगतो की, रशिया पुढे येत असल्याच्या परिस्थितीमध्ये यूक्रेन आपला बचाव करणार. मिन्स्क कराराचे सर्व ठराव लागू करणे हे रशियावर अवलंबून आहे. आम्ही रशियाला विनंती करतो की, यूक्रेनवरील आपली रणनीति सोडावी. यूक्रेन मतभेदांना राजनैतिक रुपातून सोडवण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही डी-एस्केलेशन सुनिश्चिन करण्यासाठी सर्व काही करू.’

तर अमेरिकेनेसुद्धा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हटले की, ‘आमच्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे की, यूक्रेनच्या सीमेजवळ १ लाख ५० हजारहून अधिक रशियन सैनिक येणाऱ्या काळात यूक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.’ अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील बैठकीमध्ये म्हणाले की, ‘रशियाची यूक्रेनविरुद्धातील वाढती आक्रमकता ही शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात धोकादायक आहे. यामध्ये यूक्रेनशिवाय बरेच काही धोक्यात आहे. हा क्षण लाखो लोकांच्या जीवनासाठी आणि सुरक्षेसाठी संकटाचा आहे.’


हेही वाचा – Russia Ukraine Crisis : रशियाच्या इशाऱ्यानंतर बंडखोरांनी गावात केला गोळीबार; युक्रेनचा दावा


First Published on: February 18, 2022 8:03 AM
Exit mobile version