दिल्ली – भागलपूर एक्स्प्रेसमध्ये दरोडा; प्रवाशांना मारहाण

दिल्ली – भागलपूर एक्स्प्रेसमध्ये दरोडा; प्रवाशांना मारहाण

दिल्ली - भागलपूर एक्स्प्रेसमध्ये दरोडा

नवी दिल्ली – भागलपूर एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात दरोडा पडल्याचे वृत्त समोर आले आहे. दरोडेखोरांनी बंदुक आणि धारदार शस्त्रांच्या सहाय्याने प्रवाशांना मारहाण करीत लूट केल्याचे समोर आले आहे. हा दरोडा बिहारमध्ये पडला असून या दरोड्यात सुमारे २५ लाख रुपये, दागिने आणि मोबाईल फोन्स असा मुद्देमाल त्यांनी लांबवल्याचे माध्यमांतील वृत्तांतून समोर आले आहे. लखीसराई जिल्ह्यातील धनौरी – काजरा भागात ही घटना घडली आहे.

प्रवाशांची लाखोंची संपत्ती लुटली

पटना – भागलपूर १२३५० या एक्स्प्रेसमध्ये अचानक आपत्कालीन चैन ओढून गाडी थांबवण्यात आली. ही गाडी एका निर्मनुष्य ठिकाणी तब्बल एका तास थांबवण्यात आली होती. त्यामुळे एक्स्प्रेसमध्ये एकच गोंधळ झाला. त्याच दरम्यान काही दरोडेखोरांनी प्रवाशांना हत्याराचा धाक दाखवून जवळपास लाखो रुपयांची संपत्ती लुटून नेली. दरोडा यशस्वी झाल्यानंतर लुटारु घटनास्थळावरुन पसार झाले आणि एक्स्प्रेस जमालपूरच्या दिशेने रवाना झाली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांचे डीसीपी सियाराम प्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, एक्स्प्रेस जमालपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. तसेच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून प्रवाशांकडे याबाबत चौकशी करुन आरोपींची ओळख पटवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.

First Published on: January 10, 2019 10:29 AM
Exit mobile version