Union Budget 2023: भारतीय रेल्वेसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; ‘या’ ट्रेनची संख्या वाढवली जाणार

Union Budget 2023: भारतीय रेल्वेसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; ‘या’ ट्रेनची संख्या वाढवली जाणार

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी मोठी घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींची तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च जाहीर केला आहे. यासह देशात हायस्पीड ट्रेन्सची संख्या वाढवली जाणार आहे. यासह अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु करण्यावर भर दिला जाणार आहे.

रेल्वेसाठी जाहीर केलेला 2.40 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च हा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 2013-14 या आर्थिक वर्षात केलेल्या खर्चाच्या नऊ पट आहे. रेल्वेला दिलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर आणि पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर दिला जाणार आहे. यात हायस्पीड ट्रेन्स लवकरच सुरू करण्यावर भर दिला जाईल. असंही सीतारामन म्हणाल्या.

रेल्वेतील नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा

यासह रेल्वेतील नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा केली आहे. यावर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अमृत काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. 2022-23 मध्ये रेल्वेच्या कायापालटासाठी 2.4 लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती.

या निधीतून रेल्वेचे नवीन ट्रॅक तयार करणे, हायस्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवणे, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तसेच अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु करणे यावर भर दिला जाणार आहे.


आता गरिबांना वर्षभर मिळणार मोफत रेशन, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत 1 वर्षाची वाढ

First Published on: February 1, 2023 12:22 PM
Exit mobile version