Corona: केंद्राने २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवले कोरोना निर्बंध; गृह सचिवांनी दिला सर्व राज्यांना महत्त्वाचा सल्ला

Corona: केंद्राने २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवले कोरोना निर्बंध; गृह सचिवांनी दिला सर्व राज्यांना महत्त्वाचा सल्ला

Corona: केंद्राने २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवले कोरोना निर्बंध; गृह सचिवांनी दिला सर्व राज्यांना महत्त्वाचा सल्ला

काही दिवसांपूर्वी देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत होती. मात्र आता कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २८ फेब्रुवारीपर्यंत कोरोना निर्बंध वाढवल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांना महामारीचे प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक निर्देश जारी करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले की, कोरोनासंदर्भात आवश्यक सर्व खबरदारीचे पालन करा.

गृह मंत्रालयानुसार, अजूनही देशातील ४०७ जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशात कोरोना सक्रीय रुग्ण २२ लाखांहून अधिक आहेत. जास्त करून रुग्ण वेगाने बरे होत आहेत आणि रुग्णालयात कोरोनाबाधितांची गर्दी कमी आहे. परंतु अजूनही हा चिंतेचा विषय आहे.

एवढेच नाहीतर ३४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ४०७ जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भल्ला यांनी सध्याचे कोरोना निर्बंध २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवत असल्याचे सांगत पत्रात लिहिले की, सध्याची परिस्थिती पाहात खबरदारी घेणे आणि सतर्क राहणे गरजेचे आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आवश्यक खबरदारीचे पालन केले पाहिजे आणि सुरक्षेत कोणतीही कमी केली नाही पाहिजे.

पुढे अजय भल्ला म्हणाले की, ‘१२ डिसेंबर २०२१च्या पत्रात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मानक आराखड्याच्या आधारावर स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाने त्वरित आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुरू ठेवावे. एवढेच नाही तर स्थानिक स्तरावर पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णालयात भरती होण्याच्या परिस्थितीच्या आधारावर स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचे आणि हटवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.’


हेही वाचा – Covishield आणि Covaxin लस आता खुल्या बाजारात विकण्यास DCGI ची परवानगी


 

First Published on: January 28, 2022 8:00 AM
Exit mobile version