धार्मिक स्थळे, हॉटेल, कार्यालयात जाण्यासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

धार्मिक स्थळे, हॉटेल, कार्यालयात जाण्यासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतात ३० जून पर्यंत कटेंनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन जाहीर झाला असला तरी इतर ठिकाणी हळुहळु लॉकडाऊन शिथिल केला जात आहे. ८ जून पासून देशातील धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र याबाबत आता नवी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे. अनलॉक १ च्या अंतर्गत ८ जूनपासून हॉटेल्स, मंदिरात जायला परवानगी देण्यात आली असली तरी लोकांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील लोक, ज्यामध्ये गंभीर आजाराने ग्रस्त असलेले लोक यांनी कामावर जाने टाळावे. कार्यालयात काम करताना शारिरीक अंतर, स्वच्छता, सॅनिटायजेशन सारख्या सुविधा ठेवाव्यात. यासोबतच कार्यालयात थुंकताही येणार नाही.

ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे –

हॉटेल किंवा ऑफिसच्या एंट्री गेटवर सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच गेटवरच थर्मल स्क्रिनिंग केली जावी.

कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्यांना कार्यालयात येण्याची परवानगी दिली जाणार नाही.

कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्यांना ड्रायव्हरचे काम करता येणार नाही.

गर्भवती महिला, वयोवृद्ध कर्मचारी यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे.

कार्यालयांनी शक्यतो कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय द्यावा.

ज्यांनी मास्क घातला आहे. अशाच कर्मचाऱ्यांना कार्यालयात घेतले जावे. कार्यालयात पुर्ण वेळ मास्क वापरणे बंधनकारक आहे.

कार्यालयात कोरोना पासून बचाव करण्यासाठी जनजागृती करणारे फलक लावले जावेत.

कार्यालयात येणाऱ्या विझिटर्सना वरिष्ठांची परवानगी असेल तरच घेतले जावे.

धार्मिक स्थळावर एकावेळी मोठ्या संख्येने लोकांना जमता येणार नाही.

एकमेकांपासून किमान सहा फूट अंतर राखले जावे.

धार्मिक स्थळात प्रवेश करतेवेळी हँड सॅनिटायझरची सुविधा दिली जावी.

सर्व मंदिरात थर्मल स्क्रिनिंग जरुरी आहे.

लक्षणे नसलेल्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जावा.

 

 

First Published on: June 4, 2020 11:35 PM
Exit mobile version