केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा एकदा दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा एकदा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. काल त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रात्री ११ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सध्या अमित शाह यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.  मागील दीड महिन्यात तीन वेळा शाह यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे.या अगोदर १८ ऑगस्ट रोजी शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना ३१ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

 २ ऑगस्टला झालेली कोरोनाची लागण

अमित शहा यांना २ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. अमित शहा यांनी स्वत: ट्विटवरून ही माहिती दिली होती. कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसत असल्याचे त्यांनी त्यांनी चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शाह मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:चं विलगीकरण तसंच चाचणी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती.


हे ही वाचा – कलाकारांसाठी मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच आहे – संजय राऊत


First Published on: September 13, 2020 9:58 AM
Exit mobile version