दंगेखोरांना उलटे टांगून सरळ करू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

दंगेखोरांना उलटे टांगून सरळ करू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 69 नुसार असं करणं ही फसवणूक मानली जाते आता या प्रकरणामंमध्ये 10 वर्षांपर्यंतची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा अहवाल तयार केला आहे.

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरासोबतच पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारच्या अनेक शहरांत हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. या हिंसाचारांच्या घटनांवर भाष्य करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दंगलखोरांवर कारवाईचा इशारा दिला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही दंगलखोरांना उलटे टांगून सरळ करू, असे वक्तव्य अमित शहा यांनी केले. बिहारमधील सासाराम येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर अमित शहा यांनी रविवारी नवादा जिल्ह्याचा दौरा केला.

यावेळी एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमधील जेडीयू आणि आरजेडीचे सरकार कोसळणार आहे. नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे केव्हाच बंद झाले आहेत. त्यानंतर भाजपची सत्ता आल्यास आम्ही दंगलखोरांना उलटे टांगून सरळ करू. बिहारमध्ये हिंसाचार झालेल्या ठिकाणी जाण्याची माझी इच्छा होती, परंतु दुर्दैवाने तिथे गोळीबार करून लोकांना मारले जात असल्याने मी तिथे जाऊ शकलो नाही. भाजप वोट बँकेचे राजकारण करत नाही. आमच्या शासनकाळात कुठेही दंगली होत नाही, असे हणत अमित शहांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

सत्तेच्या हव्यासापोटी नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, पण महागठबंधनचे हे सरकार आम्ही उखडून टाकू. लोकसभेच्या ४० ही जागांवर मोदींचे कमळ फुलणार आहे, हे बिहारच्या जनतेने ठरवले आहे. भाजपचे दरवाजे जेडीयूसाठी कायमचे बंद झाले आहेत. काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, टीएमसी, डीएमके हे सर्व पक्ष राममंदिराला विरोध करत होते. पण, पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचे भूमिपूजन केल्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली, असे अमित शहा म्हणाले.

First Published on: April 3, 2023 4:18 AM
Exit mobile version