देशात 2025 पर्यंत दोन लाख किमीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणार, नितीन गडकरींचे आश्वासन

देशात 2025 पर्यंत दोन लाख किमीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणार, नितीन गडकरींचे आश्वासन

देशात 2025 पर्यंत दोन लाख किमीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात येणार आहे. भारताची पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साकारण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतची भूमिका स्पष्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केली आहे. प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी केंद्र सरकार २२ ग्रीनफिल्ड ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे डिझाइन करण्याचे काम करत असल्याचे गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देशातील २ लाख किमी राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विकसित करण्याच्या दिशेना काम सुरु असल्याचे सांगितले. प्रवासासाठी कमी वेळ आणि इंधनाच्या खर्चात घट याशिवाय फास्ट ट्रॅक आणि राष्ट्रीय माहामार्ग या प्रदेशाच्या आर्थिक विकासात मदत करतात. लॉजिस्टिक्सचा खर्च सध्याच्या GDP च्या 14-16 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणणे हे केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. चीनमध्ये ते 8-10 टक्के आणि युरोपीय देशांमध्ये 12 टक्के आहे. भारतात ते 10-12 टक्क्यांपर्यंत खाली आणले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपण चांगली स्पर्धा करू शकतो, असे गडकरींनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या गति-शक्ती राष्ट्रीय योजनेअंतर्गत एकात्मिक पायाभूत सुविधांना चालना देणे मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी लोकांच्या, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीच्या एका माध्यमातून दुसऱ्या मार्गावर जाण्यासाठी एकात्मिक आणि अखंड कनेक्टिव्हिटी होईल. राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा ठरेल. यामुळे लोकांच्या प्रवासाचा वेळसुद्धा वाचेल.


हेही वाचा : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, देशाच्या आर्थिक आरोग्याचे रहस्य उघडणार

First Published on: January 31, 2022 9:27 AM
Exit mobile version