लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गौडा यांच्यावर!

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गौडा यांच्यावर!

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गौडा यांच्यावर!

देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. ३१ मे देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्यावर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. आज ते दिल्लीहून बंगळुरूला पोहोचले. विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की, उड्डाण सेवेनंतर ते क्वारंटाईन झाले नाही. याबद्दल स्पष्टीकरण देताना सदानंद गौडा म्हणाले की, मी मंत्री आहे आणि औषध मंत्रालयाचा प्रमुख आहे.

जर औषधे आणि इतर गोष्टींचा पुरवठा नसेल तर डॉक्टर रुग्णांसाठी काय करू शकतात? देशांच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात औषधांचा पुरवठा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे. मार्गदर्शक तत्त्वे सर्व नागरिकांना लागू होतात, परंतु काही जबाबदार पदावर सूट देण्याचे नियम आहेत.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयने रविवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते की, प्रवाशांना क्वारंटाईन करण्याबाबत राज्य स्वतः नियम तयार करू शकतात.

आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३९ हजार ९२८ असून मृतांचा आकडा ४ हजार ३९ आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत ५७ हजार ९८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारहून अधिक आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडू आणि गुजरात राज्य आहे.


हेही वाचा – Coronavirus: ‘लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे दिल्लीतील कोरोनाचे रुग्ण वाढले’


 

First Published on: May 25, 2020 4:29 PM
Exit mobile version