काही लहान मुलं हातात चक्क स्लिपर घेऊन सेल्फी काढतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या मजेशीर फोटोमुळे सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. जगभरातून लोक या फोटोचं आणि त्यातील मुलांच्या निरागसतेचं कौतुक करत आहेत. दरम्यान, सध्या हा फोटो इतका स्पेशल झालाय की थेट बॉलीवूडमध्येही त्याची चर्चा रंगू लागली आहे. बॉलीवूडचे कलाकारही या ‘स्लिपर सेल्फी’वर भरभरुन कमेंट्स देत आहेत. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी तर ‘मला हा फोटो फोटोशॉप केलेला वाटतो’ अशी प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. सोशल मीडियावर कधी कोण आणि कसं व्हायरल होईल? याचा काही नेम नसतो. त्याचप्रमाणे सध्या हा फोटो आणि त्यातील लहान लहान मुलं रातोरात ‘सोशल मीडिया स्टार’ बनली आहेत.
आता हा फोटो कुणी मुद्दामहून काढला आहे? की फोटोतील त्या छोट्या मुलांनी निरागसपणे अशी पोझ दिली आहे? की मग ही फोटोशॉपसारख्या एखाद्या सॉफ्टवेअरची कमाल आहे? या प्रश्नांची उत्तरं अजून समोर आलेली नाहीत. मात्र, या फोटोची पॉप्युलॅरिटी सध्या वाढली आहे हे मात्र नक्की. दरम्यान, बिग बी अमिताभ यांच्यासोबत बी-टाऊनच्या अन्य काही कलाकारांनीही या ‘स्लिपर सेल्फीवर’ आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पाहुया, या फोटोवर काय म्हणतायत बॉलीवूड सेलिब्रिटी….
.. with due respect and apology .. i feel this is photoshopped .. notice that the hand that holds the chappal is different than the rest of his body in size .. to his other hand by his side !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 3, 2019
I’m sharing this image that came in on text cause d unbridled innocence n joy of these lovely kids moved me n made me smile in equal measure
Super image that asks questions
If anyone can reliably locate these munchkins n d photog I’d love to personally send them something each pic.twitter.com/5JWBmixzSH
— atul kasbekar (@atulkasbekar) February 3, 2019
This pics gone viral on the net. Cannot get the smile off my face, or the lump out of my throat pic.twitter.com/fzMO9JwCo5
— Siddhartha Basu (@babubasu) February 3, 2019
It may not be photoshopped.. Look at the thugs kid second from left who is wearing only a single sleeper and the other one is in hand of the kid taking selfie. @SrBachchan pic.twitter.com/jXwn74HJCo
— SKG (@SG_6T) February 4, 2019