अबब! इंग्लंडमधील ३५ कोटी…१८ कॅरेट… सोन्याचं कमोड गेलं चोरीला!

अबब! इंग्लंडमधील ३५ कोटी…१८ कॅरेट… सोन्याचं कमोड गेलं चोरीला!

इंग्लंडच्या ब्लेनहेम पॅलेसमधल्या शौचालयातून सोन्याचं कमोड चोरी करून चोरांनी हाथ साफ केला आहे. १८ कॅरेट सोन्यापासून तयार केलेल्या कमोडची किंमत ३५ कोटी रूपयांपेक्षा अधिक असू शकते. चोराने मोठ्या हुशारीने इंग्लंडच्या ब्लेनहेम पॅलेसमधल्या शौचालयातून सोन्याचं कमोड चोरलं आहे. ‘अमेरिका’ या नावाने ओळखलं जाणाऱ्या या टॉयलेटचा सर्वात आधी न्यूयॉर्कमध्ये २०१६ मध्ये प्रदर्शन झाले होते. अमेरिका नावाच्या या टॉयलेटला ब्लेनहेम पॅलेसमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टंन चर्चिल यांच्या जन्म झालेल्या खोलीजवळ लावण्यात आले होते.

ब्लेनिम पॅलेसमध्ये प्रदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं हे कमोड

ऑक्सफर्डशायर शहरात असणारे ब्लेनिम पॅलेस अठराव्या शतकातील ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जाते. या पॅलेसमध्ये गुरुवारपासून प्रदर्शन सुरू झाले होते. या प्रदर्शनात हे सोन्याचं कमोड प्रदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं. शनिवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता चोरांच्या गटानं सोन्याच्या या सोन्याच्या कमोडवर डल्ला मारला, अशी माहिती थेम्स व्हॅली पोलिसांनी दिली.

मॉरिझिओ कॅटेलन यांनी बनवलं होतं हे सोन्याचं कमोड

पोलिसांनी या चोरीप्रकरणात वयवर्ष ६६ असणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. चोरीच्या प्रकरणानंतर तपास सुरू झाल्यानंतर हे पॅलेस काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. इटलीतल्या मॉरिझिओ कॅटेलन यांनी हे सोन्याचे कमोड बनवले असून डॉलरच्या किंमतीनुसार पाच मिलियन डॉलर एवढी त्याची किंमत होती. हे सोन्याचं कमोड चोरीला गेल्याने ब्लेनहेम पॅलेसचे मोठे नुकसान झाले आहे.

हे १८ कॅरेट सोन्याचं कमोड असलं तरी देखील त्याचा वापर केला जात होता. तसेच दर्शन पाहण्यासाठी आलेल्यांना याचा वापर करण्यासही सांगितलं जात होतं. ब्लेनहेम पॅलेसकडून ट्विटरवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

First Published on: September 16, 2019 1:09 PM
Exit mobile version