कुणाचं काय तर कुणाचं काय, खिडकीतून चड्ड्या,खुर्च्या फेकत नव वर्षाचं स्वागत

कुणाचं काय तर कुणाचं काय, खिडकीतून चड्ड्या,खुर्च्या फेकत नव वर्षाचं स्वागत

कुणाचं काय तर कुणाचं काय, खिडकीतून चड्ड्या,खुर्च्या फेकत नव वर्षाचं स्वागत

जगभरात नवीन वर्षांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येते. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे नवीन वर्षाचे स्वागत करत असते. परंतु जगभरातील काही देशांमध्ये अजब गजब पद्धतीने नव्या वर्षांचे स्वागत केले जाते. आपल्या घरातील वस्तू आपण जिवापेक्षा जास्त सांभाळून ठेवतो. आपण नवीन वर्षात नवीन वस्तू खरेदी करतो. पण काही देशांमध्ये घरातील वस्तू खिडकीतून बाहेर टाकून नव्या वर्षांचे स्वागत केले जाते. जाणून घेऊयात कोणत्या राज्यात कसे सेलिब्रेशन केले जाते.

इक्वाडोर


इक्वाडोर येथे नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला लोक स्केयरक्रो पुतळे जाळतात. इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की, १२ महिन्यातील वाईट गोष्टी त्याच वर्षासोबत संपवल्या जातात. जाळणाऱ्या पुतळ्याच्या आतमध्ये कागद भरले जातात.

डेनमार्क

डेनमार्कमध्ये नवीन वर्षांच्या स्वागतासाठी काचेच्या डिश फोडल्या जातात. वर्षभर काचेच्या डिश सांभाळून ठेवल्या जातात. त्यानंतर वर्षांच्या शेवटी त्या डिश फोडल्या जातात. नातेवाईकांसोबत मिळून घराच्या दारात डिश फोडतात.

जपान

जपानमध्ये बौद्ध परंपरेनुसार आधीच्या वर्षात केलेली वाईट कामे आणि आलेल्या समस्या संपवण्यासाठी १०८ वेळा घंटा वाजवली जाते. या घंटेचा आवाज ऐकण्यासाठी जापानी लोक गर्दी करतात. जपानी लोकांना हा आवाज ऐकायला अतिशय आवडते.

फिलीपिन्स


फिलीपिन्ससमध्ये नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला नाणी, कपडे आणि इतर वस्तू चारही बाजूला गोल पसरवून त्याभोवती गोल फिरतात. फिलीपिन्समध्ये असे मानले जाते की, असे केल्याने संपन्नता येते. धन मिळते. या वेळी इथले लोक पोल्का डॉट असलेले कपडे घालतात.

इटली

इटलीमध्ये नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला घरातील फर्निचर खिडक्यांमधून बाहेर टाकले जातात. कोणला काही इजा होऊ नये यासाठी लोक आता नरम आणि छोट्या वस्तू टाकतात. जुन्या फर्निचरसोबत जुन्या आठवणीही विसरल्या जातात असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे.

अर्जेंटीना

अर्जेंटीनामध्ये ३१ डिसेंबरच्या दुपारी खिडक्यांमधून जुने दस्तावेज बाहेर फेकले जातात. अर्जेंटीनामध्ये अनेक वर्षे अशी परंपरा आहे. जुने दस्तावेज नष्ट केल्याने तुमचा भूतकाळही नष्ट होतो असे त्यांचे म्हणणे आहे.

रोमानिया

रोमानियांमध्ये नव्या वर्षाच्या पू्र्वसंध्येला आपल्या जनावरांशी बोलण्याची प्रथा आहे. जनावरांशी बोलल्याने शेतकऱ्यांचे जिवन चांगले होण्यास मदत होते. शेतकऱ्यांना पैसे आणि सफलता मिळते.

दक्षिण अमेरिका

दक्षिण अमेरिकेमध्ये ३१ डिसेंबरला विविध रंगांच्या अंडरवेअर खरेदी केल्या जातात. तुमच्या अंडवेअरचा रंग हा तुमच्या येणाऱ्या वर्षांचे भविष्य ठरवतो असे सांगितले जाते. ज्यांना नव्या वर्षांत प्रेम हवे आहे त्यांनी लाल रंगाच्या अंडरवेअर खरेदी करतात. ज्यांना शांती हवी आहे त्यानी सफेद, ज्यांना पैसै हवेत त्यांनी पिवळ्या रंगाच्या अंडरवेअर खरेदी केल्या जातात.


हेही वाच – दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी! तापमान पोहोचले १.१ अंश सेल्सिअसवर

 

First Published on: January 1, 2021 5:38 PM
Exit mobile version