युपीच्या कॅबिनेट मंत्री कमल वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू

युपीच्या कॅबिनेट मंत्री कमल वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू

युपीच्या कॅबिनेट मंत्री कमल वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू

उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरुण यांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. १८ जुलै रोजी कमल वरुण यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती, त्यामध्ये त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर लखनऊ येथील पीजीआयमध्ये उपचार सुरू होते. शिवाय त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

कमल वरुण यांचा जन्म ३ मे १९५८ रोजी झाला होता. त्यांचे पूर्ण नाव कमल राणी वरुण असे होते. त्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्या होत्या. तसेच यापूर्वी त्या खासदारही होत्या. शिवाय सध्या कमल वरुण उत्तर प्रदेश सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री देखील मंत्री होत्या. दरम्यान रविवारी त्यांनी लखनऊ पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कमल वरुण यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. आदित्यनाथ यांनी लिहिले की, ‘उत्तर प्रदेश सरकारमधील माझ्या सहकारी कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचा अकाली निधनाची माहिती त्रासदायक आहे. राज्याने आज एक निष्ठावंत नेता गमावला. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.’

उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ८९ हजार ४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी १ हजार ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५१ हजार ३३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसचे सध्या ३६ हजार ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Sushant Singh Rajput प्रकरण आता ‘महाराष्ट्र विरुद्ध बिहारी’ वळणावर


 

First Published on: August 2, 2020 12:02 PM
Exit mobile version