रामजन्मभूमी पूजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी UP मुख्यमंत्री आदित्यनाथ उद्या अयोध्येत!

रामजन्मभूमी पूजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी UP मुख्यमंत्री आदित्यनाथ उद्या अयोध्येत!

अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दिशेने ५ ऑगस्ट हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. या दिवशी रामजन्मभूमीवर मंदिराची पायाभरणी होईल, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशा प्रकारच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी अयोध्या दौर्‍यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र, ट्रस्टच्या फेब्रुवारी महिन्यात मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना झाल्यापासून मंदिर बांधणीच्या कामांना वेग आला होता. दरम्यान या कोरोनामुळे मंदिर बांधकामास अडथळा निर्माण झाला होता, परंतु आता त्याच्या बांधकाम आणि रामजन्मभूमी पूजनाच्या दिवसास अवघे काही दिवसच बाकी आहेत.

तयारीचा आढावा घेण्यासाठी जाणार आयोद्धेत…

५ ऑगस्ट हा भाविकांसाठी अतिशय खास दिवस असणार आहे. कोर्टात बरीच वर्षे चाललेल्या या प्रकरणानंतर, अखेर या दिवशी, राम मंदिर बांधण्यासाठी या जागेची पूजा केली जाणार आहे आणि त्यानंतर पायाभरणी केली जाईल. पंतप्रधान मोदींसह बरेच दिग्गज लोकं या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि अशा परिस्थितीत ही तयारी जोरात उत्साहात सुरू आहे.

या रामजन्मभूमी पूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाकडे पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी २ ऑगस्टला अयोध्येत दाखल होणार आहेत. यावेळी, ते संपूर्ण मंदिर परिसरातील तयारीचा आढावा घेतील जेणेकरून ५ ऑगस्टच्या दिवशी कार्यक्रमात कोणतीही कमतरता दिसणार नाही. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी हा रामजन्मभूमी पूजन सोहळ्याचा कार्यक्रम भाविकांना घरी राहून दूरदर्शनवर पाहण्याचे आवाहन केले आहे आणि कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता अयोध्येत गर्दी न करण्याचे आव्हान देखील केले आहे.


रामजन्मभूमीच्या पुजाऱ्यासह १६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

First Published on: August 1, 2020 3:09 PM
Exit mobile version