अनैतिक संबंधाच्या संशयामुळे बायकोच्या प्रायव्हेट पार्टला नवऱ्यानेच लावले एल्युमिनियम तारेचे टाके!

अनैतिक संबंधाच्या संशयामुळे बायकोच्या प्रायव्हेट पार्टला नवऱ्यानेच लावले एल्युमिनियम तारेचे टाके!

अनैतिक संबंधाच्या संशयामुळे बायकोच्या प्रायव्हेट पार्टला नवऱ्यानेच लावले एल्युमिनियम तारेचे टाके!

एका तरुणाला पोलिसांनी बायकोवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. या तरुणाला त्याच्या बायकोवर धोका देण्याचा संशय होतो, त्यामुळे त्याने प्रायव्हेट पार्ट्समध्ये एल्युमिनियमच्या तारेने टाके घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये ही घटना घडली आहे. रविवारी पश्चिम उत्तर प्रदेश जिल्ह्यात ही हैराण करणारी घडना घडली. या घटनेनंतर महिलेला रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात आणले गेले. ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दोन महिलांच्या मदत घेतल पीडित महिला वेदना सहन करताना दिसत आहे. यामध्ये पीडितची आई आहे.

पीडित महिलेचा नवरा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. या घटनेनंतर नवरा घरातून फरार झाला होता. महिला वेदनेने तडफडत होती, परंतु तिने कसा बसा आपल्या बाजूच्या गावातील आईसोबत संपर्क साधला. त्यानंतर पीडितेच्या आईने या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली आणि पीडितेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण तिथून तिला रामपूर शहरातील मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेतील आरोपी नवऱ्याचा जाब देतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, ‘त्याची बायको गावातल्या एक दोन तरुणांना भेटत होती आणि तिचे अनैतिक संबंध होते. जेव्हा याबाबत त्याने तिला विचारणा केली की, तू असे का केले?, हे बरोबर नाही आहे. त्यानंतर त्याने तिला समजवण्याचा बराच प्रयत्न केला. पण तेव्हा त्याला राग आला आणि त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एल्युमिनियमच्या तारांचे टाके लावले.

पोलिसांनी माहितीनुसार, याबाबत कारवाई केली गेली आहे. ट्विटवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रामपूर पोलीसाने सांगितले की, ‘आम्ही महिलेची तत्काळ वैद्यकीय चाचणी केली आहे. तसेच एफआयआर देखील दाखल केला आहे.’


हेही वाचा – संतापजनक! मुलाने कानशिलात मारल्याने आईचा जागीच मृत्यू


 

First Published on: March 22, 2021 6:05 PM
Exit mobile version