UP Election 2022: सपाने १० आणखीन उमेदवारांची यादी केली जारी; अभिषेक मिश्रा आणि मोहम्मद रेहान यांचे कापले तिकिट

UP Election 2022: सपाने १० आणखीन उमेदवारांची यादी केली जारी; अभिषेक मिश्रा आणि मोहम्मद रेहान यांचे कापले तिकिट

UP Election 2022: सपाने १० आणखीन उमेदवारांची यादी केली जारी; अभिषेक मिश्रा आणि मोहम्मद रेहान यांचे कापले तिकिट

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने आणखीन १० उमेदवारांची यादी जारी केली आहे. यामध्ये माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अभिषेक मिश्रांसोबत मोहम्मद रेहान यांचे तिकिट कापले आहे. सपाने उत्तर लखनऊमधून अभिषेक मिश्रा यांना तिकिट न देता पूजा शुक्ला यांना मैदानात उतरवले आहे. याशिवाय पश्चिम लखनऊमधून मोहम्मद रेहान यांचे तिकिट कापून अरमान यांना सपाने तिकिट दिले आहे. लखनऊ मध्यतून रविदास मेहरोत्रा यांना सपाने मैदानात उतरवले आहे.

समाजवादी पार्टीने उन्नावचे बांगरमऊहून मुन्ना अल्वी, लखनऊच्या बक्शीतील तालाबहून गोमती यादव, लखनऊ पूर्वहून अनुराग भदौरिया, लखनऊ कँटहून राजू गांधी, रायबरेलीच्या बछरावाहून श्याम सुंदर भारती, इसौलीहून ताहिर खान, बबेरूहून विशंभर यादव यांना तिकिट दिले आहे. याप्रमाणे सपाने आता लखनऊच्या विधानसभा जागासाठी आपल्या सर्व सहा उमेदवारीची नावे जारी केली आहेत.

यापूर्वी सपाने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ५६ उमेदवारांची यादी जारी केली होती. यामध्ये भाजपकडून आलेल्या सिंह चौहान यांना मऊच्या घोसीमधून मैदानात उतरवण्यात आले. याशिवाय बसपाचे माजी नेते लालजी वर्मा, राम अचल राजभर आणि राकेश पांडे सपाच्या तिकिटावर अनुक्रमे कटेहरी, अकबरपूर आणि जलालपूरहून निवडणूक लढवतील.

दरम्यान यावेळेस सपा जयंत चौधरीच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोक दल, ओम प्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि इतर छोट्या राजकीय पक्षासोबत गठबंधन करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. उत्तर प्रदेश निवडणूक सात टप्प्यातील होतील. पहिल्या टप्पातील मतदान १० फेब्रुवारी, दुसऱ्या टप्पातील १४ फेब्रुवारी, तिसऱ्या टप्प्यातील २० फेब्रुवारी, चौथ्या टप्प्यातील २३ फेब्रुवारी, पाचव्या टप्प्यातील २७ फेब्रुवारी, सातव्या टप्प्यातील मतदान ३ मार्च आणि सातव्या टप्प्यातील आणि अंतिम टप्प्यातील मतदान ७ मार्चला होईल. तर मतमोजणी १० मार्चला होईल.


हेही वाचा – UP Election 2022: अखिलेश यादव यांच्याविरोधात मैदानात उतरणारे केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल कोण आहेत?


 

First Published on: February 1, 2022 4:19 PM
Exit mobile version