UP Elections 2022: सहारनपूरमध्ये मतदारांची थर्मल स्क्रीनिंग; कोरोनाबाधित आढळल्यास संध्याकाळी ५ नंतर करू शकणार मतदान

UP Elections 2022: सहारनपूरमध्ये मतदारांची थर्मल स्क्रीनिंग; कोरोनाबाधित आढळल्यास संध्याकाळी ५ नंतर करू शकणार मतदान

Coronavirus Cases Today : भारतात 50 हजारांपेक्षा कमी कोरोनाचे सक्रिय रुग्ण; 24 तासात 3,993 नवे रुग्ण, 108 रुग्णांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठीचे मतदान सुरू झाले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५७ आहे, जे आपल्या घरी आयसोलेट आहेत. पण असे असले तरीही कोरोनाबाधित रुग्ण आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतात. जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णांना मतदान करण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. कोरोनाबाधित रुग्ण संध्याकाळी ५ नंतर मतदान करू शकतात. जिल्हा प्रशासन यांना फोन करून मतदानासाठी बोलावतील. आणि कोरोना गाईडलाईनचे पालन करत त्यांना पीपीई किट घातले जाईल आणि त्यांच्यासाठी मास्क, सॅनिटायझरची सुविधा दिली जाणार आहे.

सहारनपूर प्रशासनाने कोरोनाबाधित मतदारांसाठी कशी केली व्यवस्था?

जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाधितांसाठी केलेल्या वेगळ्या मतदान केंद्रावर पीपीई कीट ठेवण्यात आली आहेl. त्यांच्या येण्या-जाण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली गेली आहे. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर कोरोनाबाधित मतदान करू शकतात. जिल्हा प्रशासन रुग्णांना फोन करू बोलवतील. यासाठी रुग्णांचे नातेवाईक आधी विभागाला माहिती देतील, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची अगोदर तयार होईल. त्यानंतर त्यांनe पीपीई कीट दिले जाईल आणि ते केंद्रात जाऊन मतदान करतील.

दरम्यान सातही विधानसभेच्या केंद्रांवर एक-एक आरोग्य कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. सात विधानसभेत १ हजार ३०८ मतदान केंद्र आहेत, जिथे २ हजार ९५० पॉलिंग बूथ बनवले गेले आहेत. सर्व केंद्रावर आरोग्य कर्मचारी तैनात असणार आहे. तसेच एक-एक कोविड हेल्प डेस्ट बनवले आहे. प्रत्येक हेल्प डेस्कवर दोन आरोग्य कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. हे आरोग्य कर्मचारी मतदारांना मास्क, सॅनिटाईजरसोबत त्यांची थर्मल स्क्रीनिंग करेल. ज्याचे शारिरीक तापमान जास्त असेल, त्याची कोरोना चाचणी केली जाईल आणि मतदान व्यवस्थेनुसार केले जाईल.

डीएमओ शिवंका गौड यांनी सांगितले की, ‘कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्व मतदान केंद्रांवर मतदान केले जाईल. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना संध्याकाळी ५ नंतर मतदान करता येणार आहे. प्रत्येकाला पीपीई किट घालून मतदान करायला लावले जाईल. त्याचबरोबर मतदारांचे बाहेर थर्मल स्क्रीनिंग केली जाईल.’


हेही वाचा – Assembly Election 2022: मतदान सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचं ट्वीट; म्हणाले, मतदान करून बनवा नवा रेकॉर्ड


 

First Published on: February 14, 2022 9:03 AM
Exit mobile version