ऑनलाईन क्लास सुरू असताना तिथेच दिसले अश्लील मेसेज आणि…

ऑनलाईन क्लास सुरू असताना तिथेच दिसले अश्लील मेसेज आणि…

यूपीमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या पहिल्याच दिवशी गोरखपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इमामबाडा गर्ल्स इंटर कॉलेजच्या गृहविज्ञान ऑनलाईन क्लासच्यावेळी व्हॉट्सअप ग्रुपवर एकनंतर एक अश्लील मेसेज यायला लागले. यामध्ये दोन व्हीडिओ आणि दोन टेक्स्ट मेसेज होते. याची माहिती लगेचच डीआईओएस ला देण्यात आली. त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. हे अश्लील मेसेज ज्या नंबरवरून पाठवण्यात आले होते तो नंबर त्याच शाळेतील एका मुलीचा होता.

लॉकडाऊनच्या काळात मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी बोर्डाने ऑनलाईन क्लासची व्यवस्था केली. सोमवारपासून शिक्षणाला सुरूवात झाली. वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आले. दुपारी शाळेच्या होम सायन्सच्या ग्रुपवर शिक्षीका रीता मौर्या यांनी विद्यार्थ्यांना विषय सांगायला सुरूवात केली. तेवढ्यात एका नंबरवरून चार अश्लील मेसेज आले. शिक्षीकेने लगेचच मुख्यध्यापिकांना याविषयी सांगितले.

मुख्यध्यापिका म्हणाले की, शाळेत असणाऱ्या डाटावरून हे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. शिक्षीका रीता मौर्या यांनी गृह विज्ञान विषयाचे ग्रुप बनवले. त्या एका नंबरवरून चार अश्लील मेसेज आले. हा नंबर याच शाळेच्या विद्यार्थीनीचा आहे. त्या विद्यार्थीनीशी बोलूनच पुढील कारवाई करण्यात येईल.


हे ही वाचा – Job alert! त्वरा करा, लॉकडाऊनमध्ये नोकरीची सुवर्ण संधी!


 

First Published on: April 21, 2020 1:34 PM
Exit mobile version