प्रसुती कायद्यातील बदलामुळे महिलांच्या नोकरीवर गदा?

प्रसुती कायद्यातील बदलामुळे महिलांच्या नोकरीवर गदा?

मातृत्व! आयुष्यातील महत्त्वाच्या आणि आनंददायी क्षणांपैकी एक. आई झाल्यानंतर होणारा आनंद, समाधान आणि सुख हे जगातील कोणत्याही सुखापेक्षा सरसच. बाळाचे संगोपन, पालनपोषण आणि त्याच्या दुडदुड्या पावलांसह पुढे सरणारे दिवस. एक वेगळाच अनुभव! पण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जमान्यात या साऱ्या गोष्टी कुठेतरी मागे पडताना दिसत आहे. नोकरी करणारी आई आणि त्यामुळे वेळेचा अभाव. यामुळे बाळाकडे लक्ष द्यायला वेळ न मिळाल्याने बाळाच्या ओढीने व्याकुळ होणारी आई. हे चित्र आता रोजचेच. पण या सर्वापासून सुटका मिळावी. बाळाला आईचा सहवास मिळाला आणि मातृत्वाचे सुवर्ण आईला जगता यावेत म्हणून सरकाने प्रसुती कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रसती रजा ही २६ आठवड्यांवरून ३६ आठवड्यांपर्यत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयामुळे १.८ दक्षलक्ष महिलांच्या नोकरीवर गदा येऊ शकते असे एका सर्व्हेतून समोर आले आहे. यामुळे महिलांना मिळणाऱ्या नोकरीमध्ये २४ टक्क्यापर्यंत घट होण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे. २०१८ -२०१९ या आर्थिक वर्षात हा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे करण्यात आला सर्व्हे

जवळपास ३०० कंपन्यांमध्ये प्रसुती रजेसंदर्भातील सर्व्हे करण्यात आला. यामध्ये हवाई, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, ई – कॉमर्स, शैक्षणिक, पर्यटन, बँकीग सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. आई झाल्यानंतर महिलांवर मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी सोडण्यासाठी सांगितले जाते. कमी शिक्षण झालेल्या किंवा चांगली आर्थिक स्थिती असलेल्या महिलांना नोकरी सोडण्यास सांगितले जाते. बऱ्याच वेळा जोडीदाराचा पगार कमी पडल्याने देखील संसाराच्या गाड्याला हातभार लागावा म्हणून देखील महिला नोकरी करतात. पण बाळंतपणानंतर मात्र महिलांवर काही बंधने येतात. शिवाय बाळाच्या संगोपनासाठी होणारी धावपळ हा देखील गंभीर प्रश्चच आहे. अशा वेळी आशादायी वाटणाऱ्या प्रसुती कायद्यातील बदलामुळे महिलांच्या नोकऱ्यांमध्ये घट होण्याची शक्यता एका सर्व्हेतून वर्तवली गेली आहे.

First Published on: June 27, 2018 2:37 PM
Exit mobile version