निकालापूर्वी सोनिया गांधी सक्रीय; सत्तास्थापनेसाठी केली अशी तयारी

निकालापूर्वी सोनिया गांधी सक्रीय; सत्तास्थापनेसाठी केली अशी तयारी

सोनिया गांधी, माजी अध्यक्ष काँग्रेस

लोकसभा निवडणूकीचा अजून एक आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. हा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा असल्याने सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही सत्ता स्थापनेसाठी कसून प्रयत्न सुरु केल्याचे दिसत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला बहूमत मिळून आपलीच सत्ता पुन्हा एकदा स्थापन होणार असल्याचा विश्वास भाजपामध्ये एकीकडे दिसतो तर दूसरीकडे भाजपाचे विरोधकांसोबत कॉंग्रेस आमचेच सरकार येणार असून बाजी आम्हीच मारू, असे सांगितले जात आहे.

राजकीय हलचालींना वेग

या सत्ता स्थापनेच्या तयारीकरिता कॉंग्रेसने लहान लहान प्रादेशिक स्तरावरील पक्षांना सोबत घेऊन जाण्याचे प्रयत्न होतांना दिसते. याकरिता दिल्लीतील घडोमोडींसह अनेक राजकीय हलचालींना मोठ्या प्रमाणात वेग आल्याचे दिसत आहे. या तयारीकरिता सर्व मित्रपक्षांना या बैठकीचे आमंत्रण देण्यासाठी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वतः एक पत्र लिहीले. या बैठकीसाठी फक्त मित्रपक्षांनाच नाही तर त्याच्यासह जे पक्ष ‘एनडीए’ आणि ‘यूपीए’ चा सहभाग नाहीत अशा सर्व पक्षांना सोनिया गांधीनी या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

निकालाच्या दिवशी बैठकीचे आयोजन

लोकसभा निवडणुकीचा १९ मे या दिवशी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार असून २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. या बैठकीचे आयोजन देखील निकालाच्या दिवशी म्हणजेच २३ तारखेला करण्यात आले आहे. सर्व प्रमुख पक्षांचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

यासाठी असेल ही खास बैठक

या बैठकीमध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना देखील सहभागी होण्यासाठी फोनवरून आमंत्रण दिल्याचे कळते आहे. या बैठकीच्या दिवशी निर्माण झालेल्या परिस्थितीवर वेळीच तोडगा काढणार असल्याने या बैठकीचे नियोजन २३ तारखेला केल्याचे समजते आहे.

First Published on: May 16, 2019 9:51 AM
Exit mobile version