UPSC पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली, २० मे रोजी कळणार नवे वेळापत्रक

UPSC पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली, २० मे रोजी कळणार नवे वेळापत्रक

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुर्व परिक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. देशभरातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी परिक्षेच्या घोषणेची वाट पाहत होते. ३१ मे रोजी यूपीएससीने ही परिक्षा होईल, असे सांगितले होते. मात्र आज ही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन तारखेची घोषणा आता २० मे रोजी होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आले की, “३१ मे रोजी होणारी पुर्वपरिक्षा स्थगित करण्यात येत आहे. लवकरच कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन नवीन तारीख २० मे रोजी घोषित करण्यात येईल.”

यूपीएससीच्या वेळापत्रकानुसार लोकसेवा आयोगाच्या पुर्वपरिक्षेसाठी या आठवड्यात हॉलतिकीट येणे अपेक्षित होते. मात्र त्याआधीच ही परिक्षा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तिसरा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाला पत्र पाठवून परिक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांना आश्वासित केले होते की, परिक्षेचे वेळापत्रक बदलताना विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला जाईल. जेणेकरुन त्यांना त्यांच्या परिक्षा केंद्रापर्यंत पोहोचता येईल.

First Published on: May 4, 2020 4:37 PM
Exit mobile version