UPSC Prelim : उमेदवारांनो तयारीला लागा, यूपीएससी 2025 चे वेळापत्रक जाहीर

UPSC Prelim : उमेदवारांनो तयारीला लागा, यूपीएससी 2025 चे वेळापत्रक जाहीर

उमेदवारांनो तयारीला लागा, यूपीएससी 2025 चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : यूपीएससी 2025 पूर्वपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा या फेब्रुवारी 2025 पासून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे यूपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तयारीला लागण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना http://upsc.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. (UPSC Prelims Schedule Announced)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा 2025 आणि आयएफएस (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) 2025 ची परीक्षा 25 मे 2025 घेण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना 22 जानेवारी 2025 ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी उमेदवारांना 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर, संयुक्त जिओ-सायंटिस्ट, इंजिनिअरिंग सव्हिसेस, सीबीआय, सीआयएसएफ, एनडीए, सीडीएस, आयईएस/आयएसएस आणि इतर-परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा… 10th and 12th Result 2024: दहावी, बारावीचा निकाल कधी? मोठी अपडेट समोर; या दिवशी लागणार निकाल

यूपीएससीची मुख्य परीक्षा ही 22 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना नागरी सेवा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा 2025 साठी 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. तर, 25 मे रोजी या पदासाठीची पूर्वपरीक्षा होईल आणि नागरी सेवा मुख्य परीक्षा 22 ऑगस्ट तसेच वनसेवा मुख्य परीक्षा 16 नोव्हेंबरला सुरू होईल. त्यामुळे या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी 18 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. तर, या पदासाठीची पूर्वपरीक्षा ही 09 फेब्रुवारी 2025 रोजी होईल आणि 26 जूनला मुख्य परीक्षा होईल. त्याशिवाय, संयुक्त जीओ सायंटिस्ट पूर्वपरीक्षा 09 फेब्रुवारी 2025 रोजी, तर मुख्य परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. संयुक्त वैद्यकीय सेवापरीक्षा 20 जुलैला होणार आहे. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (पीटी) आणि संयुक्त भू वैज्ञानिक पदासाठीच्या परीक्षा 09 फेब्रुवारीला होणार आहेत, यासाठीची मुख्य परीक्षा 21 जून रोजी होणार आहे.


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 29, 2024 4:06 PM
Exit mobile version